16 April 2024 3:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IDFC First Bank Share Price | बँक FD असा परतावा देणार नाही! पण या बँकेचा शेअर अल्पावधीत देईल 50 टक्केपर्यंत परतावा Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! या टॉप 3 शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत 57 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Port Share Price | अदानी पोर्ट शेअरमध्ये मोठी घसरण होणार? गुंतवणूकदारांनी नेमकं काय करावं? अपडेट आली Lloyds Metal Share Price | कुबेर कृपा करणारा 11 रुपयाचा शेअर, गुंतवणूकदार 3 वर्षात करोडपती झाले, खरेदी करणार? TCS Share Price | तज्ज्ञांकडून टीसीएस शेअर्सला 'ओव्हरवेट' रेटिंग, जाहीर केली मजबूत टार्गेट प्राईस Ambuja Cement Share Price | अदानी ग्रुपचा सिमेंट शेअर! कंपनीने नवीन अपडेट दिली, शेअर 35 टक्के वाढणार Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सची ट्रेडिंग रेंज 20-30 रुपये मध्ये अडकली, सकारात्मक बातमीनंतर तज्ज्ञांनी काय म्हटलं?
x

चांद्रयान-३ साठी केंद्र सरकारची परवानगी; २०२० मध्ये ‘गगन’भरारी

Chandrayan 3, ISRO Chief K Sivan

बेंगळुरू: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख के. सिवन यांनी नवी लक्ष्य आणि योजनांची माहिती देत नव्या वर्षाचे स्वागत केले आहे. या वेळी सिवन यांनी ‘गगनयान’ आणि ‘चांद्रयान-३’ या मोहिमांची माहिती दिली. अंतराळ विज्ञानाद्वारे देशातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सिवन यांनी यावेळी सांगितले. गेल्या वर्षातच या दोन मोहिमांची तयारी करण्यात आल्याचेही सिवन म्हणाले. मोहिमेसाठी एकूण ६०० कोटी रुपये इतका खर्च येणार असल्याची माहितीही के. सिवन यांनी दिली.

“२०२० मध्ये आम्ही चांद्रयान-३ लॉन्च करणार आहोत. गगनयानच्या अंतराळवीरांना जानेवारीच्या महिन्याच्या तिसऱ्या महिन्यापासून प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली जाणार आहे. गगनयान मोहिमेसाठी चार अंतराळवीरांची निवड करण्यात आली आहे. यासाठी राष्ट्रीय स्तरावर सल्ला समितीचं गठन करण्यात आलं आहे. २०१९ मध्ये गगनयान मोहिमेत आम्ही चांगली प्रगती केली आहे,” अशी माहिती के सिवन यांनी दिली आहे.

दरम्यान, चांद्रयान-2 मोहिमेवेळी लँडर चंद्राच्या पृष्टभागावर आदळून तुटला होता. त्यामुळे पुढील मोहिमेसाठी लँडरचे पाय हे अधिक मजबूत करण्यात येणार आहेत. त्यामुळे वेगाने लँडिंग झाले तरी लँडरची मोडतोड होणार नाही. तसेच इस्रो एक नवा रोव्हर आणि लँडर तयार करत आहे. मात्र लँडरचे वजन आणि त्यात लावण्यात येणाऱ्या उपकरणांबाबत अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही.

Web Title:  ISRO Chief K Sivan Says Central Government has approved Chandrayan 3.

हॅशटॅग्स

#PSLV(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x