28 March 2024 5:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल? Reliance Share Price | होय! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पैसे दुप्पट करणार, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राइस जाहीर
x

'मग मुख्यमंत्री कशाला झालात; वडिलांची इच्छा पूर्ण करायला?'

CM Uddhav Thackeray, BJP State President Chandrakant Patil

पुणे: राज्यातील सत्तासंघर्षानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मदतीने मुख्यमंत्रिपद मिळविले त्यामुळे भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर राहावं लागलं. विरोधी पक्षातील भारतीय जनता पक्षाने आक्रमक पवित्रा घेत राज्य सरकारवर विशेषत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका करण्यास सुरुवात केली आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी झालात का? असा सवाल केला आहे.

‘साखरे संदर्भातील एका कार्यक्रमात हे म्हणतात की, साखरेचा विषय आला की मी जयंत पाटलांकडे पाहतो. महसूलचा विषय आला की मी बाळासाहेब थोरातांकडे पाहतो. मग तुम्ही काय करता. केवळ वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही मुख्यमंत्री झाला आहात का आणि राज्याला असा मुख्यमंत्री चालणार आहे का,’अशी बोचरी टीका करत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

तसेच अवेळी पावसाच्यावेळी ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर गेले, बांध काय आहे हे तुम्हाला कळतं नाही, एकर, हेक्टर याचा फरक माहित नाही. हेक्टर म्हणजे काय? एका हेक्टरमध्ये किती एकर, एक एकरात किती गुंठे अन् एका गुंठ्यात किती चौरस फूट जागा असते हे पहिलं सांगा. एमएसपी, एफआरपी हे सुद्धा कळत नाही. कोणत्याही प्रश्नांची उत्तरे माहिती नाही असा घणाघात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केला.

दिवंगत नेते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही पद घेतले नाही. त्यांनी ठरविले असते तर ते राष्ट्रपतीसुद्धा झाले असते. मात्र, त्यात शान होती. पहिल्यांदाच आमदार झालेल्यांना थोडे प्रशिक्षण घेऊ द्या की, असा सल्ला पाटील यांनी देत आदित्य ठाकरे यांनी कॅबिनेट मंत्रीपदाच्या घेतलेल्या शपथेवरही टीका केली.

 

Web Title:  BJP state President Chandrakant Patil lashes Chief Minister Uddhav Thackeray.

हॅशटॅग्स

#Chandrakant Patil(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x