19 April 2024 11:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत महिना SIP करा, हमखास 12 लाख रुपये परतावा मिळेल BYD Atto 3 | खुशखबर! आता BYD Atto 3 ई-कारला नो वेटिंग, झटपट डिलिव्हरी मिळणार, प्राईससह फीचर्स जाणून घ्या ICICI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा! महिना 10,000 रुपयांच्या SIP ने मिळेल 78.32 लाख रुपये परतावा, स्कीम लक्षात ठेवा Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील
x

ज्यांनी बाळासाहेबांना धोका दिला, त्यांचा सत्यानाश झाला: मंत्री गुलाबराव पाटील

Minister Gulabrao Patil, Raj Thackeray

नाशिक: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं आडनाव ठाकरे नसतं, तर ते आज संगीतकारांमध्ये दिसले असते, अशी जहरी टीका शिवसेनेचे आमदार आणि नवनिर्वाचित पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे. नाशिकमध्ये पोटनिवडणुकीच्या प्रचारात ते बोलत होते.

‘राज्याचा कॅबिनेट मंत्री पानवाला आहे. ही किमया वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्येच केली जाते. महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाची पार्टी राहिलीच कुठे आहे? ही तुमच्याकडे दिसते तरी थोडी, आमच्याकडे तर लोणच्यालाही नाही. ज्यांनी बाळासाहेबांना धोका दिला, त्यांचा सत्यानाश झाला आहे. यांचे सरनेम, यांच्या नेत्याचे नाव जर ठाकरे नसते, तर कुठेतरी संगीतकारांमध्ये दिसले असते. त्यामुळे ठाकरे आडनावाचे वलय त्यांच्याकडे दिसत आहे, असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

गुलाबराव यांनी यावेळी विरोधकांवर सडकून टीका केली. ‘भाजपवाले म्हणतात हे सरकार चालणार नाही? म्हणजे तुम्ही कोणाशीही युती केलेली चालते आणि आम्ही केली की चालत नाही?’, असा सवाल गुलाबरावांनी यावेळी उपस्थित केला. भारतीय जनता पक्ष निवडणुकीत फक्त पैशाचा वापर करते बाकी त्यांच्याकडे दुसरं काही नाही, असा आरोपही मंत्री गुलाबराव यांनी केला आहे.

नाशिकमधील प्रभाग क्रमांक २६ च्या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार मधुकरराव जाधव यांच्या प्रचारार्थ गुलाबराव पाटील नाशिकमध्ये आले होते, त्यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर हल्लाबोल केला. दरम्यान, काल झालेल्या खातेवाटपादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये गुलाबराव पाटील यांना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रीपद देण्यात आले आहे.

 

Web Title:  Minister and Shivsena MLA Gulabrao Patil criticized MNS Chief Raj Thackeray During Nashik corporation by poll election.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x