29 March 2024 8:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 30 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर?
x

सध्याचं राजकारण पाहता भविष्यात भाजप-मनसे एकत्र येऊ शकतात: आ. राजू पाटील

MLA Raju Patil, Raj Thackeray

मुंबई : २३ जानेवारी रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. याच दिवशी राज ठाकरेंनी मनसेच्या महाअधिवेशानचे आयोजन केलं आहे. राजकीय वर्तुळामधील चर्चेनुसार त्याचवेळी मनसेची नवीन भूमिका राज स्पष्ट करणार असल्याचे समजते. इतकच नाही तर मनसेचा झेंडा बदलण्याची घोषणाही या महाअधिवेशनात होण्याची शक्यता आहे. मनसेचा सध्याच्या झेंड्यामध्ये निळा, पांढरा, भगवा आणि हिरवा रंग आहे. मात्र आता हा झेंडा बदलून तो पूर्णपणे भगवा किंवा केशरी केला जाणार आहे. यासंदर्भात पक्षातील नेत्यांबरोबर चर्चा झाल्याचे समजते.

दुसरीकडे, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडविणारी बातमी पुढे आली. गेल्या काही वर्षांपासून भाजपवर तुटून पडणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आता नवी भूमिका घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक झाल्याची माहिती पुढे आली. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पुढच्या वाटचालीत ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जातेय. मुंबईत या दोनही नेत्यांमध्ये दीड तास खलबतं झाली असून त्यात नव्या राजकारणाबद्दल चर्चा झाल्याची माहिती पुढे आलं. त्यामुळे यापुढच्या काळात भाजप आणि मनसे एकत्र येण्याची शक्यता आहे.

त्यामुळे राज्यातील राजकारणात नवी समीकरणं तयार होण्याची शक्यता आहे. यावर आता वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. मनसेचे एकमेव आमदार असलेल्या राजू पाटील यांनी देखील मनसे आणि भाजप एकत्र येऊ शकते असं सूचक वक्तव्य केलं आहे.

आमदार राजू पाटील म्हणाले, “सभागृहामधील परिस्थिती आपण बघत आहात. त्यामुळे भविष्यात मनसे भाजप एकत्र येऊ शकतात. सध्या जे राजकारण सुरू आहे ते तुम्ही पाहत आहात. मात्र, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमध्ये काय घडलं याची कल्पना नाही.”

मात्र शिवसेनेचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचा शिवसेनेवर कोणताही परिणाम होणार नसल्याची प्रतिक्रिया दिली. शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेल्याने आता मनसेसाठी आपला राजकीय अवकाश मिळवण्याचं आव्हान आहे. म्हणूनच भाजपच्या मदतीने आपली जागा मिळवण्याच्या पर्यायावर मनसे विचार करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

Web Title:  MLS MLA Raju Patil comment on alliance with BJP in Future.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x