29 March 2024 4:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर? IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?
x

नागपूर जिल्हा परिषद 'भाजपमुक्त'; फडणवीसांना मोठा राजकीय धक्का

Former CM Devendra Fadnavis

नागपूर: नागपूर जिल्हा परिषदेच्या ५८ आणि १३ पंचायत समितीच्या ११६ जागांसाठी जिल्ह्य़ात मंगळवारी सरासरी ६७ टक्के मतदारांनी मतदारांचा हक्क बजावला होता. या निवडणुकीत झालेले भरघोस मतदान बघता धक्कादायक निकाल अपेक्षित होता. सकाळपासूनच धक्कादायक निकाल सुरू आहेत.

याबाबत सत्ताधारी मंत्री जयंत पाटील यांनी भारतीय जनता पक्षाला टोला लगावत म्हटलंय की, भारतीय जनता पक्षाच्या पराभवाची सुरुवात विदर्भातील नागपूरमधून झाली असून स्थानिक स्वराज्य संस्थेवर बसवलेली पकड आज उध्वस्त झाली आहे. नागपूर जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्ष निवडणूक घेण्यास टाळत होता. वेगवेगळ्या कारणांमुळे ही निवडणूक पुढे जात होती. परंतु, आज निवडणूक झाली असून ज्या नागपूर जिल्हयात भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते आहेत त्याच जिल्हयात भारतीय जनता पक्षाला पराभव पत्करावा लागला. नागपूरकरांनी भारतीय जनता पक्षावर नाराजी व्यक्त केली त्याची दखल महाराष्ट्र घेईल असं त्यांनी सांगितले.

नागपूरातील भारतीय जनता पक्षाच्या पिछेहाटीला बावनकुळे फॅक्टरला जबाबदार धरलं जातं असल्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळेंना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादीनं सुरुंग लावला आहे.

नागपूरसह राज्यातील धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि पालघर या ६ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. मंगळवारी झालेल्या मतदानानंतर बुधवारी सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते नितीन गडकरी यांना मोठा धक्का बसला आहे. गडकरींचे मूळ गाव धापेवाडा येथून काँग्रेसचे उमेदवार काँग्रेसचे महेंद्र डोंगरे विजयी झाले आहेत. दरम्यान, सर्वच जिल्हा परिषदांमध्ये आजी-माजी मंत्र्यांसह सर्वपक्षीय दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

 

Web Title: Nagpur ZP election 2020 result congress won BJP lost former CM Devendra Fadnavis.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x