19 April 2024 9:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

CAA विरोध: सुरक्षेच्या कारणामुळे मोदींचा आसाम दौरा दुसऱ्यांदा रद्द

Assam CAA, PM Narendra Modi, Khelo India Youth Games

गुवाहाटी: खेलो इंडिया या युवा राष्ट्रीय स्पर्धेला साममधल्या गुवाहाटी येथे १० जानेवारीसून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचे उद्धाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होते. पण आता खेलो इंडियाच्या उद्घाटन सोहळ्याला मोदी येणार नसल्याचे वृत्त समोर आले आहे. आपल्या जीवाला असणारा मोठा धोका टाळण्यासाठीन नरेंद्र मोदी यांनी हे पाऊल उचलले असल्याचे म्हटले जात आहे. नरेंद्र मोदी दौऱ्यावर आले तर मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं जाईल अशी धमकी ऑल आसाम स्टुडंट्स युनियनकडून देण्यात आली होती.

राज्य सरकारकडून यासंबंधी निवेदन जारी करण्यात आलं आहे. यामध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, “पंतप्रधान नरेंद्र मोदी युथ गेम्सच्या उद्घाटनासाठी येणार नाहीत. मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल दिल्लीला जाऊन नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. यावेळी मोदींना २२ जानेवारीला होणाऱ्या सांगता समारंभासाठी उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण देण्यात येण्यासंबंधी चर्चा होणार आहे”.

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये जाणार असून काही नियोजित कार्यक्रम आहेत. आसाम आणि पश्चिम बंगालमधील कार्यक्रम एकाच दिवशी असल्याने आसामचा दौरा रद्द करण्यात आला आहे. नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून यूथ गेम्सचं उद्घाटन करणार होते. मात्र ती योजनाही रद्द करावी लागली आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून अर्थात CAA आणि NRC वरून राजकारण तापलेले आहे. या गोष्टीचे तीव्र प्रतिसाद आसामध्ये उमटल्याचे पाहायला मिळत आहेत.

 

Web Title:  Prime Minister Narendra Modi CAA Citizenship act Khelo India Youth Games Assam.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x