29 March 2024 1:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

मनसेचे विचार आणि कार्यपद्धती बदलली तर भविष्यात विचार करु शकतो: फडणवीस

Raj Thackeray, Devendra Fadnavis

मुंबई : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्षाच्या झेंड्याचा रंग बदलणार असल्याची चर्चा सुरु असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्ष भविष्यात एकत्र येणार असल्याच्या तर्कवितर्कांना उधाण आले आहे. त्यातच मंगळवारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या गुप्त भेटीनंतर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत.

त्यामुळे येत्या २३ तारखेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे भाजपसोबत जाण्याचा निर्णय जाहीर करतील असा अंदाज देखील काहींनी वर्तवला होता. दोन दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात भेट झाल्याचं देखील बोललं जात होतं. परंतु, यावर आता खुद्द फडणवीस यांचीच प्रतिक्रिया आली आहे. याबाबत लोकमत सरपंच अवॉर्ड सोहळ्यात विरोधी पक्षनेते आणि भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे उत्तर दिलंय.

राज ठाकरेंसोबत बैठक झाली का असं विचारलं असता देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या भेटी अनेक वेळा झाल्या आहेत असं सांगत उत्तर देणं टाळलं. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्र येण्याचं कोणतीही चिन्ह नाही. त्यांच्या आणि आमच्या विचारात अतंर आहे. आणि जोपर्यंत विचार आणि कार्यपद्धतीत अंतर आहे तोपर्यंत आम्ही एकत्र येऊ शकत नाही. त्यांचे विचार आणि कार्यपद्धती बदलली तर भविष्यात विचार करु शकतो” असं फाडावीसांनी स्पष्ट केलं.

 

Web Title:  BJP leader Devendra Fadnavis talked about meet with MNS Chief Raj Thackeray.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x