29 March 2024 11:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर दैनिक चार्टवर ट्रेंड लाइन ब्रेकआउट देत आहे, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स स्टॉकबाबत तज्ञ उत्साही, नवीन टार्गेट प्राइस जाहीर, किती परतावा मिळणार? Bonus Share News | सुवर्ण संधी! ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, वेळीच एन्ट्री घेऊन फायदा घेणार? IFCI Share Price | शेअरची किंमत 39 रुपये! IFCI शेअर चार्ट पॅटर्नमध्ये सकारात्मक वाढीचे संकेत, यापूर्वी 350% परतावा दिला Infosys Share Price | इन्फोसिस शेअरला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, या पातळीवर टिकल्यास अल्पावधीत उच्चांक किंमत स्पर्श करणार Mutual Fund SIP | मार्ग श्रीमंतीचा! या 10 म्युच्युअल फंड SIP दरवर्षी 40% ते 71% परतावा देतं आहेत, सेव्ह करा यादी Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, ही योजना देईल मोठा व्याज दर
x

केरळात CAA विरोध: भाजप-आरएसएस कार्यकर्त्यांना बंदी असल्याचे घराबाहेर स्टिकर्स लावले

RSS. BJP, CAA

केरळ: देशभरात सध्या CAA वरून वातावरण तापल्याच दिसत आहे. देशभरात भाजपाला देखील त्यामुळे प्रचंड रोष सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये या विरोधाने रुद्र रूप धारण केले आहे. त्याचा रोष थेट मोदी आणि अमित शहा यांना देखील सहन करावा लागत आहे. आज खेलो इंडिया या युवा राष्ट्रीय स्पर्धेला साममधल्या गुवाहाटी येथे १० जानेवारीसून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचे उद्धाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होते. पण आता खेलो इंडियाच्या उद्घाटन सोहळ्याला मोदी येणार नसल्याचे वृत्त समोर आले आहे. आपल्या जीवाला असणारा मोठा धोका टाळण्यासाठीन नरेंद्र मोदी यांनी हे पाऊल उचलले असल्याचे म्हटले जात आहे. नरेंद्र मोदी दौऱ्यावर आले तर मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं जाईल अशी धमकी ऑल आसाम स्टुडंट्स युनियनकडून देण्यात आली होती.

विशेष म्हणजे हा वाद आता थेट सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोहोचला आहे. कालच्या सुनावणीत नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) संवैधानिक घोषित करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर तात्काळ सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिला. सध्या देश कठीण प्रसंगातून जात आहे आणि हिंसाचाराचं प्रमाण वाढलं आहे, असं कोर्टानं म्हटलं. सरन्यायाधीश एस. ए. बोबडे, न्या. बी. आर. गवई, न्या. सूर्यकांत यांच्या खंडपीठानं याचिकेवर आश्चर्य व्यक्त करतानाच, पहिल्यांदाच कुणी एखादा कायदा संवैधानिक घोषित करण्याची विनंती करत आहे, असं मत व्यक्त केलं. यावरून परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो.

केरळ राज्य सरकार CAA वरून आक्रमक झालेलं असताना आता केरळ मधील सामान्य लोकं देखील भारतीय जनता पक्ष आणि आरएसएस विरुद्ध आक्रमक पवित्रा घेताना दिसत आहेत. कोझिकोडे येथील कोडियाथोर गावात ‘ब्लॅक कोब्रा कोडियाथोर’ संघटनेच्या कारकर्त्यांनी तर घराघरांवर थेट भाजप आणि आरएसएस विरोधी पोस्टर्स लावण्यास सुरुवात केल्याचे वृत्त आहे. त्यावर भाजप आणि आरएसएस कार्यकर्त्यांना प्रवेश बंदी असल्याचे सांगत, CAA संबंधित माहिती देऊन समर्थन मागणाऱ्या कार्यकर्त्यांना उभं केलं जाणार नाही असं लिहिलं आहे.

 

Web Title:  Black Cobra Kodiyathur have put up posters outside few houses in Kodiyathoor village that state BJP and RSS workers not allowed.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x