16 April 2024 7:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 17 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 17 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या IDFC First Bank Share Price | बँक FD असा परतावा देणार नाही! पण या बँकेचा शेअर अल्पावधीत देईल 50 टक्केपर्यंत परतावा Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! या टॉप 3 शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत 57 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Port Share Price | अदानी पोर्ट शेअरमध्ये मोठी घसरण होणार? गुंतवणूकदारांनी नेमकं काय करावं? अपडेट आली Lloyds Metal Share Price | कुबेर कृपा करणारा 11 रुपयाचा शेअर, गुंतवणूकदार 3 वर्षात करोडपती झाले, खरेदी करणार? TCS Share Price | तज्ज्ञांकडून टीसीएस शेअर्सला 'ओव्हरवेट' रेटिंग, जाहीर केली मजबूत टार्गेट प्राईस
x

नाशिक: महाविकास आघाडीमुळे मनसेचे दिलीप दातीर यांचा पोटनिवडणुकीत पराभव

MNS Dilip Datir, MNS, Shivsena, Nashik By Poll, Raj Thackeray

नाशिक: नाशिकमध्ये दोन जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे प्रयोग यशस्वी झाले आहेत. नाशिकमध्ये प्रभाग क्रमांक २६ च्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे मधुकर जाधव विजयी झाले आहेत. इथं महाविकास आघाडी प्रयोग यशस्वी झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे शिवसेनेनं जागा राखली आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेचे उमेदवार मधुकर जाधव यांना पाठिंबा जाहीर केला होता. जाधव यांच्याविरोधात सेनेतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत गेलेले उमेदवार दिलीप दातीर हे उभे होते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दिलीप दातीर यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. तर या प्रभागात भारतीय जनता पक्षाचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिला. खान्देशी मतं ठरली निर्णायक ठरल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, या पोटनिवडणुकीत निच्चांकी मतदान झालं होतं. नाशिक महापालिका पोटनिवडणुकीत दोन्ही जागी भाजपचा पराभव झाला आहे. प्रभाग २६ मध्ये शिवसेनेचे मधुकर जाधव, २२ मध्ये महाविकास आघाडीचे जगदीश पवार विजयी झाले. जाधवांकडून मनसेचे दिलीप दातीर पराभूत झाले आहेत, मात्र भाजप थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेल्याने ३ वर्षांपूर्वीची भाजपची लाट ओसरली आहे असंच म्हणावं लागेल.

राज्यातील सत्तेचं टॉनिक मिळताच शिवसेनेला उभारी आली असून त्याचे प्रतिबिंब स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतही दिसत आहे. जिल्हा परिषद निवडणुकांत यशाचा आलेख उंचावणाऱ्या शिवसेनेने मुंबई महापालिकेच्या पोटनिवडणुकीतही विजयाचा झेंडा फडकवला आहे. त्यामुळे शिवसेनेचं पालिकेतील बळंही वाढलं आहे.

मुंबई महापालिकेतील मानखुर्द प्रभागातील पोटनिवडणुकीत शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला धक्का दिला आहे. शिवसेना उमेदवार विठ्ठल लोकरे प्रभाग क्रमांक १४१ मधून विजयी झाले. लोकरेंनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार दिनेश पांचाळ यांचा पराभव केला.

मानखुर्द प्रभागातील पोटनिवडणुकीत शिवसेनेविरोधात महाविकास आघाडीतील नवा मित्रपक्ष काँग्रेस आणि जुना मित्रपक्ष भारतीय जनता पक्ष उभे ठाकले होते. मात्र शिवसेनेचे उमेदवार विठ्ठल लोकरे यांना ४ हजार ४२७ मतं मिळाली, तर भारतीय जनता पक्षाच्या दिनेश पांचाळ यांना ३ हजार ०४२ मतं पडली. त्यामुळे १ हजार ३८५ मतांनी दिनेश पांचाळ पराभूत झाले. काँग्रेसच्या अल्ताफ काझी यांना अवघी तीनशे मतं पडली.

 

Web Title:  MNS Candidate Dilip Datir Lost Nashik By Poll Election against Mahavikas Aghadi.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x