19 April 2024 8:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 19 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, अल्पावधीत दिला 85 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
x

JNU: सीसीटीव्ही'त दिसणाऱ्या मुलीचं नाव कोमल शर्मा असून ती ABVP संबंधित - ऑल्ट न्यूज़ वृत्त

JNU Attack, Suspect Girl from ABVP, ABVP Komal Sharma

नवी दिल्ली: जेएनयूमध्ये ५ जानेवारी रोजी झालेल्या हल्ल्यात व्हिडिओमध्ये दिसलेल्या मुलीची ओळख ओळख समोर आली आहे. सरकारने आणि पोलिसांनी डोळेझाक केली असली त्यावर समाज माध्यमांवर अनेक पुरावे समोर आले असून त्यात ‘फॅक्टचेक’ केल्यानंतर तथ्य असल्याचं उघड झालं आहे आणि तसा दावा ऑल्टन्यूज आणि सत्य हिंदी न्यूज पोर्टलने केले आहेत.

या संपूर्ण वृत्तात अनेक पुरावे समोर आले असून त्यात संबंधित मुलीचे वर्णन फोटो आणि तिने मित्रांसोबत केलेल्या संवादातून उघड झालं आहे, तसेच ती ABVP’ची कार्यकर्ती असल्याचं स्पष्ट झालं आहे. विशेष म्हणजे ‘फॅक्ट चेक’ मध्ये समोर आलेलं तथ्य आणि पोलिसांनी केलेल्या दाव्याच्या अगदी विरोधात आहे. जेएनयू हिंसाचाराच्या चौकशीसाठी दिल्ली पोलिसांनी काल त्या हल्ल्यात डाव्या विचारसरणीशी संबंधित बहुसंख्य विद्यार्थी संघटना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची नावे जाहीर केली आहेत. विशेष म्हणजे त्यात एकही ABVP संबंधित कार्यकर्ता किंवा कार्यकर्तीचं नाव नसल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र पुराव्यांचं फॅक्ट चेक केल्यावर दिल्ली पोलिसांचं पितळ देखील उघडं पडल्याचं म्हटलं आहे. दुसरी धक्कादायक गोष्ट म्हणजे डोकी फोडणारे बाजूला राहिले असून, ज्यांची डोकी फुटली त्यांच्यावरच पोलीस चौकशीत ठपका ठेवण्यात आला आहे. आयेशी घोष हिने सुद्धा पोलिसांची भूमिका पूर्वग्रहदूषित असल्याचं म्हटलं आहे.

नेमकं काय स्पष्ट झालं आहे फॅक्ट-चेक’ मध्ये

जेएनयूमध्ये किमान २ डझन मुखवटा घातलेल्या लोकांनी कॅम्पसमध्ये हत्यार घेऊन हौदोस घातला आणि त्यात अनेक विद्यार्थी आणिशिक्षक गंभीरपणे जखमी झाले होते. यात जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा आयेशी घोष देखील जखमी झाली होती. या हल्ल्यात जखमी झालेल्या किमान ३४ जणांना त्यावेळी तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा प्रसार माध्यमांना आणि पोलिसांना विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा आयेशी घोष माहिती देताना म्हटलं होतं की, ‘मुखवटा घातलेल्या गुंडांनी आमच्यावर प्राणघातक हल्ला केला. मला देखील जबर मारहाण केल्याने डोक्याला गंभीर इजा झाली होती. मुखवटा घातलेलय त्या मुला-मुलींनी तब्बल ३ तास विद्यापीठात धुडगूस घातला होता. त्यावेळी JNU मधील विद्यार्थ्यांनी मुखवटा घातलेल्या लोकांचा एक व्हिडिओ रेकॉर्ड करून तो व्हायरल केला होता, ज्यामध्ये मुखवटा घातलेल्या एका मुलीची सर्वाधिक चर्चा झाली होती.

त्यानंतर JNU आणि दिल्ली विद्यापीठातील अनेक मित्र मत्रिणींनी ‘त्या’ मुलीच्या पेहरावावरून आणि तिचा देहबोलीवरून ती दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थिनी कोमल शर्मा असल्याचं म्हटलं आणि ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न ABVP’ संघटनेची सक्रिय कार्यकर्ती असल्याचं देखील म्हटलं आहे. यावरून विद्यापीठातील मित्र-मैत्रीणमध्येच चर्चा सुरु झाली होती आणि त्यातील एका संवादात कोमल शर्मा पकडली देखील गेली आहे असं म्हणता येईल.

याचा तपास अल्ट न्यूजने त्यांच्या फॅक्टचेक मध्ये केला आहे. त्यांच्यानुसार इन्स्टाग्राम पोस्टमध्येही असाच दावा करण्यात आला होता. अनुजा ठाकूर नावाच्या यूजरने इन्स्टाग्रामवर कोमल शर्मा नावाच्या मुलीशी झालेल्या संभाषणाचे स्क्रीन रेकॉर्डिंग पोस्ट केले आहेत. कोमल शर्माचे युजर नेम “26_सारावशिष्ठ” होते. अनुजा ठाकूरने असा दावा केला की हे संभाषण कोमल शर्मा यांच्याशी झाले होते. त्यानुसार ती (कोमल शर्मा) हल्ला करणाऱ्या जमावाचा भाग होती. स्क्रीन रेकॉर्डिंगमध्ये कोमल शर्मा’ने स्वतः जेएनयू कॅम्पसमध्ये आपल्या उपस्थितीची कबुली देखील देत असल्याचं स्पष्ट होतं आहे. मात्र सर्व प्रकार उघडकीस येण्याच्या भीतीने आता “26_saravashisth” नावाचा प्रोफाइल (यूजर नेम) इन्स्टाग्रामवरून डिलीट करण्यात आला आहे आणि सध्या सदर अकाउंट डिऍक्टिव्हेट करण्यात आल्याचं फॅक्ट चेक’मध्ये समोर आलं आहे.

 

View this post on Instagram

 

Komal Sharma Student Activist from ABVP was my junior in college as well as in school. Last night I messaged her just to confirm the fact if she was there at JNU campus or not but I asked her indirectly starting from that ‘I saw you today at Munirka’ and ‘if she was wearing red white checkered shirt’ and her admission to all my questions (which were my urges to confirm her presence there at the campus) with the following audio in which she says ‘Didi, please kisiko matt batana’ is the legal evidence that she is the same person as in the pictures that were leaked yesterday confirming the fact that she was the girl with the iron stick in the “unidentified mobs”. I screen recorded her audio and chat as her Instagram account is no longer found. Share this as much as you can. #goonsofabvp @reallyswara @umar_khalid87 @youthkiawaaz @kanhaiyakumar @ravishndtv @peeinghuman @unbhakt @akashbanerjee.in @mallikadua @anuragkashyap10 @vidushak

A post shared by Anuja Thakur (@anujathakur30) on

अनुजा ठाकूरने तिच्या पोस्टमध्ये दावा केला आहे की “कोमल शर्मा ABVP कार्यकर्ता माझ्या महाविद्यालयात आणि शाळेतील कनिष्ठ विद्यार्थिनी होती. ती जेएनयूमध्ये आहे का याची खात्री करण्यासाठी मी काल रात्रीच तिला अप्रत्यक्षपणे विचारणा केली आणि त्यात कोमल शर्माला विचारलं “आज मी तुला मुखवट्यामध्ये पाहिलं’ आणि ‘तू लाल आणि फिकट चेक शर्ट घातला होता का?’ आणि त्यावर तिने माझे सर्व प्रश्न मान्य केले. विशेष म्हणजे अनुजा ठाकूरने स्वतःच्या पोस्टमध्ये त्या संभाषणाचा संपूर्ण ऑडिओ देखील पुरावा म्हणून दिला आहे. ज्यामध्ये कोमल शर्मा तिला ‘दीदी, कृपया कोणालाही सांगू नका’ असे म्हणताना स्पष्ट ऐकू येत आहे. त्यामुळे अनुजा ठाकूरने दावा केल्याप्रमाणे या रेकॉर्डिंगचा कायदेशीर पुरावा म्हणून देखील वापर करता आला असता. तसेच अल्ट न्यूजशी झालेल्या संभाषणात देखील अनुजा ठाकूरने याबाबत कोमल शर्माशी इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे संपर्क केल्याचं म्हटलं आहे.

विशेष म्हणजे अनुजा ठाकूरचा भाऊ अपूर्व ठाकूर यांनीही हे आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केले आहे. त्यामध्ये कोमल शर्मा अनुजा ठाकूरच्या प्रश्नाला जी उतार देत आहे त्याची समाज माध्यमांवर चर्चा रंगली आहे. त्यामध्ये प्रतिउत्तर म्हणून कोमल शर्माने व्हायरल फोटो देखील शेअर केले जे तिच्याशी संबंधित आहेत.

जेव्हा ‘ऑल्ट न्यूज़’ ने ’26_saravashisth’ या युजरची फॅक्ट चेक केली असता, संबधित इंस्टाग्राम अकाउंट ABVP कार्यकर्ती कोमल शर्माचं असल्याचं स्पष्ट आलं आहे. अर्काइव्ड वर्जनमधून सदर अकाऊंटचं तथ्य समोर आलं आहे.

माहिती उघड होऊ लागल्याने ABVP कार्यकर्ती कोमल शर्माचा फेसबुक प्रोफाइल सध्या डिऍक्टिव्हेट करण्यात आला आहे. तिचा जुना फेसबुक प्रोफाइल आणि ट्विटर हॅण्डल (सारा वशिष्ठ) इन्स्टाग्रामवर सारखीच माहिती दर्शवत आहेत. फेसबुक अकाउंटमधील प्रोफाईल फोटो जुलै २०१७ मधील असल्याचं दिसतं.

तत्पूर्वी कोमल शर्माने ABVP सदस्य भरत शर्माच्या समर्थनार्थ देखील एक ट्वीट केलं होतं आणि हे ट्विट १८ डिसेंबर २०१९ रोजी करण्यात आलं होतं. त्यावरून ती ABVP कार्यकर्त्यांच्या हिंसक प्रकारांचं समर्थन करत असते त्याचा खाली पुरावा आहे.

या सर्व पुराव्यांच्या आधारे, ‘अल्ट न्यूज’ ने निष्कर्ष काढला की जेएनयू कॅम्पसमध्ये व्हायरल झालेल्या व्हिडिओतील मुखवट्या’मध्ये दिसणारी मुलगी ABVP कार्यकर्ता कोमल शर्मा असल्याचं म्हटलं आहे. तसेच शुक्रवारी इंडिया टुडेने एक स्ट्रिंग ऑपरेशन’मध्ये अनेक ABVP कार्यकर्ते स्पष्टपणे बोलताना दिसतात की त्यांच्याकडून हा हिंसाचार झाला होता आणि त्यांनीच ABVP’च्या लोकांना एकत्र जमवून हा हल्ला केला होता. परंतु या हल्ल्याच्या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या लोकांवर ठपका ठेऊन ABVP विरूद्ध एकही पुरावा मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आलं आहे.

 

 

Web Title:  JNU Attack suspect girl belongs to ABVP says Satya Hindi Web News Portal.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x