16 April 2024 7:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 17 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 17 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या IDFC First Bank Share Price | बँक FD असा परतावा देणार नाही! पण या बँकेचा शेअर अल्पावधीत देईल 50 टक्केपर्यंत परतावा Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! या टॉप 3 शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत 57 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Port Share Price | अदानी पोर्ट शेअरमध्ये मोठी घसरण होणार? गुंतवणूकदारांनी नेमकं काय करावं? अपडेट आली Lloyds Metal Share Price | कुबेर कृपा करणारा 11 रुपयाचा शेअर, गुंतवणूकदार 3 वर्षात करोडपती झाले, खरेदी करणार? TCS Share Price | तज्ज्ञांकडून टीसीएस शेअर्सला 'ओव्हरवेट' रेटिंग, जाहीर केली मजबूत टार्गेट प्राईस
x

#VIDEO - खासदार छत्रपती संभाजी राजेंचं 'त्या' पुस्तकावरून भाजपाला चोख प्रतिउत्तर

BJP MP Sambhajirajes, Shivsena MP Sanjay Raut

मुंबईः महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणाऱ्या ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या पुस्तक प्रकाशनाचे तीव्र पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणात उमटायला सुरुवात झाली आहे. शिवसेना नेते संजय राऊत आणि राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्यात यावरून ट्विटर वॉर पाहायला मिळाले आहे. भारतीय जनता पक्षात शिरलेल्या छत्रपतीच्या वंशजांना ही तुलना मान्य आहे का?, असा सवाल करणाऱ्या संजय राऊत यांना छत्रपती संभाजी राजे यांनी तितक्याच आक्रमकपणे उत्तर दिले आहे.

त्यावर राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी देखील याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संजय राऊत यांच्या जिभेला लगाम घालण्यास देखील सांगितले आहे. त्यांची मुजोरी सहन केली जाणार नसल्याचा इशारा देखील खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी ट्विटद्वारे दिला आहे.

तत्पूर्वी जिजाऊ जयंती दिनी सिंदखेड राजा येथे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी भाजपाला नेमकं प्रत्युत्तर दिलं ते देखील समोर आलं आहे. त्यामुळे साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले जरी भाजपमध्ये असल्याने शांत असले तरी कोल्हापूरचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मात्र रोखठोक भूमिका घेतल्याची चर्चा समाज माध्यमांवर रंगली आहे. मात्र, भाजपच्या कृत्यावर महाराष्ट्र संतापलेला असताना साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले मूग गिळून शांत बसल्याने आश्चर्य देखील व्यक्त करण्यात येतं आहे.

 

Web Title:  BJP MP Sambhajirajes Angry shivsena leader Shivsena MP Sanjay Raut.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x