25 April 2024 11:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

त्या पुस्तकावरून छत्रपती उदयराजे भोसले, शिवेंद्रराजे आणि राज्य भाजप शांत?

Former MP Udayanraje Bhosale, MLA Shivendraraje Bhosale, Chhtrapati Sambhaji Maharaj

सातारा: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणाऱ्या ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या पुस्तक प्रकाशनाचे तीव्र पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणात उमटायला सुरुवात झाली आहे. शिवसेना नेते संजय राऊत आणि राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्यात यावरून ट्विटर वॉर पाहायला मिळाले आहे. भारतीय जनता पक्षात शिरलेल्या छत्रपतीच्या वंशजांना ही तुलना मान्य आहे का?, असा सवाल करणाऱ्या संजय राऊत यांना छत्रपती संभाजी राजे यांनी तितक्याच आक्रमकपणे उत्तर दिले आहे.

त्यावर राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी देखील याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संजय राऊत यांच्या जिभेला लगाम घालण्यास देखील सांगितले आहे. त्यांची मुजोरी सहन केली जाणार नसल्याचा इशारा देखील खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी ट्विटद्वारे दिला आहे.

तत्पूर्वी जिजाऊ जयंती दिनी सिंदखेड राजा येथे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी भाजपाला नेमकं प्रत्युत्तर दिलं ते देखील समोर आलं आहे. त्यामुळे साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले जरी भाजपमध्ये असल्याने शांत असले तरी कोल्हापूरचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मात्र रोखठोक भूमिका घेतल्याची चर्चा समाज माध्यमांवर रंगली आहे. मात्र, भाजपच्या कृत्यावर महाराष्ट्र संतापलेला असताना साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले मूग गिळून शांत बसल्याने आश्चर्य देखील व्यक्त करण्यात येतं आहे.

दिल्लीतील भाजपचे नेते जयभगवान गोयल यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणारे ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ हे पुस्तक लिहिले आहे. भाजपाच्या दिल्लीतील कार्यालयात धार्मिक, सांस्कृतिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी या भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हे पुस्तक प्रकाशीत करण्यात आले.

 

Web Title:  Former MP Udayanraje Bhosale and Shivendraraje Bhosale never reply over book released by BJP at Delhi.

हॅशटॅग्स

#Udayanraje Bhosale(54)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x