28 March 2024 1:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव प्रचंड महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील वाढीव दर तपासून घ्या Zomato Share Price | झोमॅटो शेअरने ब्रेकआऊट दिला, अल्पावधीत मोठी कमाई होणार, पुढील टार्गेट प्राइस जाणून घ्या Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करणारा 42 रुपयाचा शेअर! 1 वर्षात 2400% परतावा दिला, पुढेही मल्टिबॅगर? IRFC Vs RVNL Share | या शेअरने 1 वर्षात दिला 297% परतावा, आता कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉकवर परिणाम होणार? Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीबाबत मोठी अपडेट आली, शेअरवर परिणाम होणार? तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? Bank of Maharashtra | पैशाचा पाऊस! बँक ऑफ महाराष्ट्र शेअर आज 4.48 टक्के वाढला, लवकरच 77 रुपयांवर जाणार Tata Group IPO | पैसे तयार ठेवा! टाटा ग्रुपच्या उपकंपन्याचे IPO लाँच होणार, गुंतवणूकदारांची GMP वर नजर
x

योगेश सोमण सुट्टीवर गेले, गणेश चंदनशिवे मुंबई विद्यापीठाचे प्रभारी संचालक

Mumbai University, RSS, Yogesh Soman

मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या थियेटर ऑफ आर्ट्सचे संचालक योगेश सोमण यांना आम्ही सक्तीच्या रजेवर न पाठवता त्यांनी सुट्टीसाठी अर्ज केला असून ते सुट्टीवर गेल्याची माहिती विद्यापीठाने दिली आहे. दरम्यान त्यांच्या जागी प्रभारी संचालक म्हणून प्राध्यापक गणेश चंदनशिवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तत्पूर्वी अभाविपने राजकीय षड्यंत्र असल्याचे सांगत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निषेध केला. या निषेधाचाच भाग म्हणून अभाविपचे शिष्टमंडळ गुरुवारी कुलसचिवांची भेट घेण्यासाठी मुंबई विद्यापीठात पोहोचले आणि त्यांनी काही मागण्या केल्या. या मागण्यांमध्ये जर योगेश सोमण यांची नियुक्ती चुकीची असेल किंवा ते त्या पदासाठी अपात्र असतील, तर मागील ५ वर्षांत विद्यापीठात ज्या अधिकारी किंवा प्राध्यापकांच्या नियुक्त्या झाल्या त्यांच्या पात्रतेचीही चौकशी करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली होती. अभाविपच्या या निवेदनानंतर योगेश सोमण हे सक्तीच्या रजेवर नाहीत. ते पहिल्यापासूनच सुट्टीवर असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले.

तर दुसरीकडे रजेवर असलेल्या योगेश सोमण यांच्या जागी प्राध्यापक गणेश चंदनशिवे यांना मुंबई विद्यापीठाच्या थिएटर अँड आर्टस् विभागाचे प्रभारी संचालक म्हणून धुरा सांभाळणार आहेत. सोमण हे सुट्टीवर गेल्यानंतर आता प्रा गणेश चंदनशिवे यांची प्रभारी विभागप्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. योगेश सोमण प्रकरणात मुंबई विद्यापीठाने नेमलेल्या समितीचा निर्णय येईपर्यंत गणेश चंदनशिवे कारभार पाहणार आहेत. गणेश चंदनशिवे हे मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे विभागप्रमुख म्हणून काम पाहत आहेत.

तत्पूर्वी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले होते, योगेश सोमण ही व्यक्ती, त्यांनी स्वतःच जाहीर केल्याप्रमाणे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. त्यांना शिकवण्याचा कोणताही अनुभव नाही, नाट्यशास्त्र विभागाची कोणतीही पदवी यांनी घेतलेली नाही. ते राज्यशास्त्र विभागाचे विद्यार्थी होते, असे असतानाही काही योग्य आणि पात्र व्यक्तींना डावलून सोमण यांची मुंबई विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती असा दावा देखील त्यांनी केला होता.

 

Web Title:  Yogesh Soman not forced leave so they have already applied leave says Mumbai University officials.

हॅशटॅग्स

#Congress(527)#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x