25 April 2024 4:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार? Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्स खरेदीला गर्दी, अवघ्या 4 वर्षात 1 लाख रुपयांवर दिला 21 लाख रुपये परतावा Amara Raja Share Price | मार्ग श्रीमंतीचा! हा शेअर खरेदी करा, अवघ्या 5 दिवसात दिला 33 टक्के परतावा
x

उद्धव ठाकरे - राज ठाकरेंमध्ये राजकीय मतभेद; पण कौटुंबिक नातं कायमचं राहणार: संजय राऊत

Raj Thackeray, Uddhav Thackeray, Shivsena MP Sanjay Raut

बेळगाव: बेळगातील गोगटे रंगमंदिरात शनिवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी अनेक विषयावर भाष्य केलं. यावेळी त्यांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या भावडांच्या संबंधावर प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. यावर त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिले. ते म्हणाले की, ‘उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये राजकीय मतभेद आहेत पण त्यांचं कौटुंबिक नातं अजूनही कायम आहे. दोघांच्या वाटा वेगळ्या असतील, त्यांचे विचार वेगळे असतील, पण त्यांचं नातं कायमचं राहणार आहे. हे कोणीही नाकारू शकत नाही.’

आमच्या विचाराचे नसलेल्या लोकांशी आमची मैत्री आहे. राज ठाकरे तर आमचे जवळचे आहेत, अनेक वर्ष त्यांच्यासोबत आम्ही एकत्र काम केलं आहे. त्यामुळे माझं राज ठाकरे यांच्याशी मैत्रीचं नातं आहे आणि ते आजही टिकलेलं आहे. मैत्री असणे गुन्हा नाही. मात्र मी शिवसैनिक आहे आणि राज ठाकरे त्यांच्या पक्षासाठी काम करतात, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

यावेळी राऊत यांनी काश्मीर प्रश्नावरूनही केंद्र सरकारच्या धोरणावर बोट ठेवले. अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर काश्मीरमधील परिस्थिती सुधारलेली नाही. तेथील बातम्या बाहेर येत नसल्यामुळे ही गोष्ट इतरांना कळत नाही. मात्र, काश्मीरमध्ये अजूनही बंदुकीच्या बळावर गाडा रेटला जात आहे. देशात सुरु असलेल्या या घडामोडींमुळे, हेच हिंदुत्व असल्याचा अनेकांना वाटू लागले आहे. त्यामुळे मुसलमान सोडा आता हिंदू समाजाचेच काऊन्सिलिंग करण्याची गरज निर्माण झाली आहे. आपले काश्मीर म्हणता म्हणता देशाचा एखादा तुकडाच तुटणार नाही ना, असे वाटू लागल्याचे राऊत यांनी सांगितले.

सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगावात गेलेले महाराष्ट्राचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील येड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांनी अटक करून आपला महाराष्ट्र द्वेष दाखवला असतानाच शिवसेना नेते संजय राऊत एका कार्यक्रमासाठी बेळगावात दाखल झाले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी कर्नाटकमधील भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला. दरम्यान, राऊत यांच्या बेळगाव दौऱ्याने शहरात काहीसे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

 

Web Title:  Shivsena MP Sanjay Raut talked about Raj Thackeray and Uddhav Thackeray relation.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x