20 April 2024 8:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

कोरोना विषाणू'मुळे चीनमध्ये भीतीचं वातावरण; भारतातही धोक्याची घंटा

China, China Corona Virus, Human to Human Corona Virus

नवी दिल्ली: भारत देशासोबत जगातल्या देशांवर एका धोकादायक वायरसचे सावट आहे. हे धोकादायक वायरस चीनमध्ये आढळले आहे. कोरोना वायरस असे या वायरसचे नाव आहे. चीनमध्ये एकूण ५९ लोकांना या धोकादायक वायरसची लागण झाली आहे. आता हा वायरस संपूर्ण जगात पसरत आहे. मीडिया रिपोर्टनुसार थायलँडमध्ये कोरोना वायरसने एकाचा बळी घेतला आहे.

हा संसर्गजन्य विषाणू असल्यामुळे चीनमधून हा वायरस इतर देशांमध्ये पसरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. २५ जानेवारीपासून चीनमध्ये नवीन वर्ष सुरु होणार आहे. यावेळी अनेकांना सुट्टी असल्याने ते इतर देशात फिरण्यासाठी जातात. थायलँड आणि जपानमध्येही कोरोन वायरसची तीन प्रकरणे पुढे आली आहेत. साउथ कोरियामध्येही सोमवारी या वायरसचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. ३५ वर्षाची चीनी महिला वुहानमधून सियोलला आली होती. अमेरिकेतील विमानतळावरही चीनमधून येणाऱ्या पर्यटकांची कसून तपासणी करण्यात येत आहे.

करॉन हा विषाणू सर्वसाधारणपणे प्राण्यांमध्ये आढळून येतो. अनेकदा या विषाणूचा प्रसार प्राण्यामधून माणसांमध्ये होतो, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. या विषाणूती लागण झाल्यास श्वासाशी संबंधित गंभीर आजारा होऊ शकतो. या विषाणूची लागण झाल्यानंतर त्यावर उपचार उपलब्ध नाहीत. कधी कधी या विषाणूमुळे होणाऱ्या आजाराची लक्षणे आरोआप दूर होतात.

२००२-२००३ या काळात चीन व हाँगकाँग या भागात त्यामुळे ६५० लोक मरण पावले होते. वुहानमध्ये एकूण १.१० कोटी रहिवासी असून ते मोठे वाहतूक ठिकाण आहे. चीनचे नव चांद्र वर्ष या आठवडय़ात सुरू होणार असून त्यानिमित्ताने लोकांचे पर्यटन वाढले आहे. आता या विषाणूची लागण झाल्याने आतापर्यंत तिसरा जण मृत्युमुखी पडल्याचे निष्पन्न झाले आहे. १३६ नवीन रुग्णांना त्याची लागण झाली असून एकूण २०१ जणांना त्याची लागण झाल्याचे निदान आतापर्यंत करण्यात आले आहे.

 

Web Title:  Human to Human transmission China confirms danger Corona Virus.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x