29 March 2024 5:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 30 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर?
x

बॅडमिंटनपटू प्राजक्ता सावंतची अमित यांच्या पुढाकाराने नायब तहसीलदार पदी नियुक्ती झाली होती

Amit Raj Thackeray, Prajakta Sawant

मुंबई : आज मनसेचे नेते आणि माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी अमित ठाकरे यांची मनसेच्या नेते पदी निवड करण्याचा ठराव मांडला. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आता अमित ठाकरे यांच्याकडे पक्षातील निर्णय घेण्याचा अधिकार देखील बहाल झाला आहे. त्यामुळे त्यांनी भविष्यतील स्वतःच्या व्हिजन बद्दल देखील मंचावर बोलताना थोडक्यात मांडणी केली.

यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना अमित ठाकरे म्हणाले की, ‘आतापर्यंत मला जे प्रेम आणि प्रतिसाद दिलात तो यापुढेही द्याल, अशी मी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो. सर्वांच्या आशीर्वादानं शिक्षण ठराव मी तुमच्यासमोर मांडतो आहे. परवडणारी आणि गुणवत्तेच्या शिक्षणासाठी संपूर्ण शिक्षण व्यवस्थेची पुनर्रचना होणं आवश्यक आहे. लहान मुलांच्या पाठीवरचं ओझं कमी करण्यासाठी त्वरित अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. महाराष्ट्रात जागतिक स्तराचे खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी क्रीडा विद्यापीठ स्थापन होणं अतिशय आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन प्रशिक्षण वर्ग सुरू होणे गरजेचं असल्याचं सांगत शिक्षण ठराव मांडला आहे.

त्यामुळे राज्यातील विद्यार्थी आणि विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काम करण्याचा मानस यावेळी अमित ठाकरे यांनी व्यक्त केला आणि भविष्यातील वाटचालीबद्दल प्रस्ताव मांडताना सूतोवाच केल्याचं दिसलं. त्यामुळे भविष्यात विद्यार्थीसाठी जमिनीवर आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने काही तरी मोठं करण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली. यावेळी त्यांनी क्रीडा विद्यापीठ स्थापन होणं गरजेचं असल्याचं म्हटलं. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची आपल्या देशात कमी नाही. मात्र अनेकदा अशी कामगिरी करून देखील त्यांच्या वाट्याला सरकारी अनास्था आल्याची अनेक उदाहरणं आपल्या देशात आहेत.

अगदीच अमित ठाकरे यांच्या बाबतीत उदाहरण द्यायचे झाल्यास, राष्ट्रीय बॅडमिंटनपटू प्राजक्ता सावंतचे मागील दोन अडीज वर्षांपासून खेळाडू कोट्यातून नायब तहसीलदार पदी नियुक्तीसाठी सरकार दरबारी प्रयत्नं सुरु होते. सरकार दरबारी हा विषय दीर्घ काळापासून प्रलंबित असल्याने तिने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे यांच्याकडे या विषयासंदर्भात पाठपुरावा करण्याची विनंती केली होती.

एखाद्या राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूला त्याच्या हक्कासाठी सरकार दरबारी दीर्घकाळ ताटकळत ठेवणे नवीन नाही. यापूर्वी सुद्धा राष्ट्रीय खेळाडूंबद्दल सरकारी अनास्था पाहायला मिळाली आहे. प्राजक्ता सावंत ही २०१० आणि २०११ मधील राष्ट्रीय बॅडमिंटन विजेती आहे. राज्य सरकारच्या दरबारी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला विषय तिने अखेर अमित ठाकरेंकडे मांडून, त्यांना पुढाकार घेण्याची विनंती केली होती. त्याप्रमाणे अमित ठाकरे यांनी तत्कालीन खेळ मंत्रालयाचे मंत्री विनोद तावडेंची भेट घेऊन हा विषय मार्गी लावण्याची विनंती विनोद तावडेंना केली होती.

त्यानंतर अखेर प्राजक्ता सावंतची अनेक वर्षांपासूनची प्रलंबित असलेली मागणी मार्गी लागली होती आणि फडणवीस सरकारकडून तिची नायब तहसीलदार पदी नियुक्ती करत तिला अधिकृतपणे नियुक्ती पत्र दिलं होतं.

 

Web Title:  Amit Thackeray was helped National Badminton player Prajakta Sawant to get job of Nayab Tahasildar.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x