18 April 2024 2:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, अल्पावधीत दिला 85 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला Stocks in Focus | मार्ग श्रीमंतीचा! हे टॉप 5 बँकिंग शेअर्स तुम्हाला अल्पावधीत 38 टक्केपर्यंत परतावा देतील, संधी सोडू नका Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा! या शेअरने 3 वर्षात दिला 358% परतावा, आता सकारात्मक बातमी आली IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी मालामाल होण्याची संधी, मजबूत फायदा होईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्स गुंतवणुकदारांना झटपट मालामाल करतोय, खरेदीला गर्दी Infosys Share Price | भरवशाच्या इन्फोसिस शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांनी किती दिली टार्गेट प्राईस?
x

हिंदुत्वाच्या राज'मार्गामुळे सेनेचा थयथयाट? राज यांना थेट सामना'च्या अग्रलेखात स्थान

MNS Maha Adhiveshan, HIndutva Issue, Raj Thackeray, Shivsena, Saamana Newspaper

मुंबई: राज ठाकरे यांनी शिवसेनेशी फारकत घेऊन मनसेची स्थापना केल्यापासून राज ठाकरे आणि मनसेला सामना वृत्तपत्रात स्थानच नव्हतं. अगदीच राज ठाकरेंच्या मनसेची एखादी बातमी आलीच तरी त्या बातमीला एखादा कोपराच मिळत असे. मात्र ज्यावर आजपर्यंत राजकारण केलं तो हिंदुत्वाचा मुद्दा आणि महाविकास आघाडीत सरकारमध्ये झालेली हिंदुत्वाच्या मुद्द्याची कोंडी यामुळे शिवसेना पेचात अडकली आहे. त्यामुळे बदलत्या राजकीय समीकरणामुळे कोंडी झाली असताना राज ठाकरे यांनी हिंदुत्वाला हात घालताच शिवसेनेच्या जळफळाटाने मनसे आणि राज ठाकरे यांना थाट सामनाच्या अग्रलेखात स्थान दिल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून शिवसेनेची या मुद्यावरून किती कोंडी झाली आहे याचा प्रत्यय येऊ लागला आहे.

वीर सावरकर आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व पेलणे हा काही येरागबाळ्यांचा खेळ नाही. तरीही या देशात कुणी हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी नवी घडी बसवत असेल तर त्यांचे स्वागत करण्याची दिलदारी आमच्याकडे आहेच. विचार ‘उसना’ असला तरी हिंदुत्वाचाच आहे. झेपेल तर पुढे जा असं म्हणत शिवसेनेनं मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

दोन झेंड्यांची योजना करणे हे गोंधळलेल्या मनःस्थितीचे किंवा घसरलेल्या गाडीचे लक्षण आहे असं म्हणत सामनातून मनसेवर जोरदार टीका करण्यात आली आहे. गेल्या १४ वर्षांत राज ठाकरे यांना ‘मराठी’ प्रश्नावर काही भव्य काम करता आले नाही आणि आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाग्य आजमवता येईल काय? याबाबत शंकाच जास्त आहेत. ‘मनसे’प्रमुखांना त्यांचे मुद्दे मांडण्याचा आणि पुढे रेटण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण त्यांनी आज घेतलेल्या भूमिका व त्याच विषयावर १५ दिवसांपूर्वी मांडलेली मते मेळ खात नाहीत, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

राज यांनी घेतलेली भूमिका कशी शिवसेनाद्वेषातून आली आहे, हेही अग्रलेखात सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाची शिवसेनाद्वेषाची मूळव्याध दुसऱ्या मार्गातून बाहेर येत आहे आणि हे त्यांचे खेळ जुनेच आहेत, असा टोला राज ठाकरे यांना लगावण्यात आला आहे.

दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही राजकीय पक्षांनी गुरुवारी मुंबईत स्वतंत्र कार्यक्रमांचं आयोजन केलं. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षाला नवी उभारी देण्यासाठी नव्या झेंड्याचं अनावरण केलं आणि हिंदुत्वाची मोट बांधण्यास सुरुवात केली. यावर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून घणाघाती टीका करण्यात आली आहे. यामध्ये देशातल्या पाकिस्तानी आणि बांग्लादेशी मुस्लिमांना हालकवण्यासाठी एखाद्या पक्षाने थेट झेंडा बदलावा ही गमतीची बाब असल्याची खिल्ली अग्रलेखातून उडवण्यात आली आहे.

 

Web Title:  Shivsena criticized MNS Chief Raj Thackeray through Saamana Newspaper over Hindutva issue.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x