25 April 2024 6:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

माझं CAA'ला समर्थन नाही; मोर्चा घुसखोर पाकिस्तानी-बांगलादेशीं विरोधात: राज ठाकरे

CAA, NRC, Raj Thackeray, MNS Morcha

मुंबई:  राज ठाकरे यांनी आज सीएए’बाबत मनसेची भूमिका स्पष्ट केली आहे. सध्या देशात सीएए-एनआरसीविरोधात निघणाऱ्या मोर्चांविरोधात आपण मोर्चा काढणार, मोर्चाला मोर्चानं उत्तर देणार अशी भूमिका राज ठाकरेंनी जाहीर केली होती. यानंतर आता राज यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याबद्दलची त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. माझं सीएएला समर्थन नाही. मनसेचा ९ फेब्रुवारीला निघणारा मोर्चा कायद्याच्या समर्थनार्थ नसेल, तर घुसखोर पाकिस्तानी आणि बांगलादेशींना समर्थन देणाऱ्या मोर्चांविरोधात असेल, असं म्हणत राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मला हिंदूह्रदयसम्राट म्हणू नका अशी सूचना पदाधिकाऱ्यांना काल दिली होती. मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक काल आयोजित करण्यात आली होती. रंगशारदा येथे या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला राज ठाकरे मार्गदर्शन करणार होते. मात्र राज ठाकरे १० मिनिटांतच बैठकीतून निघून गेल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. दरम्यान राज ठाकरे यांची तब्येत ठीक नसल्याने ते बैठकीतून निघून गेल्याचं सांगण्यात येत आलं.

नागरिकत्व सुधारणा कायद्याला अनुसरून पक्षाच्यावतीने एक कणखर भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली आहे. परंतु त्यावरुन मनसेच्या नेत्यांमध्येच मतमतांतरं असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे राज ठाकरे आज सलग दुसऱ्या दिवशी नेते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचं वृत्त होतं. राज ठाकरे यांनी ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी सकाळी १० वाजता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. एनआरसीला पाठिंबा देण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये गोंधळ आहे. त्यासंदर्भातच ही बैठक असून पदाधिकाऱ्यांच्या शंकांचं निरसन होण्याचीही शक्यता वर्तविण्यात आली होती.

या मोर्चासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली असून त्यांच्या उत्तराची आम्ही वाट पाहात आहोत, असे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. काळाच्या बैठकी दरम्यान भारतीय जनता पक्षाचे नेते आशीष शेलार उपस्थित झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र आपण वैयक्तिक कारणासाठी आलो होतो, असे शेलार यांनी पत्रकारांना सांगितले.

 

Web Title:  MNS Chief Raj Thackeray clear party stand over CAA and Morcha organised on Nine February in Mumbai.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x