23 April 2024 12:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत खरेदी करा 30 शेअर्स, हे टॉप 10 पेनी शेअर्स श्रीमंत करू शकतात Vikas Lifecare Share Price | 5 रुपयाचा शेअर सुसाट तेजीत, अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतोय, नेमकं कारण काय? Tata Technologies Share Price | तेजीत कमाई होणार, टाटा टेक्नॉलॉजी शेअरसह हे 4 शेअर्स अल्पावधीत खिसा भरणार Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, सकारात्मक अपडेटने स्टॉक सुसाट धावणार SBI Salary Account | SBI बँक सॅलरी अकाउंटचा घ्या फायदा, अनेक चार्जेस पासून होईल सुटका Quant Mutual Fund | शेअर्स नको? या 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, जलद पैसा वाढवा Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची विशेष योजना, दरमहा बचतीवर खात्रीने मिळेल 80,000 रुपयांचा परतावा
x

विनोद तावडेंच्या दिल्लीत विराट सभा; महाराष्ट्रात सरकारी शाळा बंद करण्याचा विक्रम

BJP Leader Vinod Tawde, Arvind Kejariwal, Delhi Assembly Election 2020

नवी दिल्ली: अवघ्या १० दिवसांवर आलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीला भाजपने आता हिंदू-मुस्लीम आणि भारत-पाकिस्तान असाच रंग देण्याची पुरेपूर योजना आखली आहे. त्यात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी सोमवारी आपल्या प्रचारसभेत भाजप समर्थकांना ‘गोली मारो’च्या घोषणा द्यायला उद्युक्त केल्यानंतर, मंगळवारी दिल्लीचे लोकसभेतील खासदार प्रवेश वर्मा यांनीही दिल्लीत भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यास आपल्या मतदारसंघातील सरकारी जमिनींवरील सर्व मशिदी हटविण्याची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनवेळा युद्धात पराभूत झालेल्या पाकिस्तानला हरवायला ३ दिवसही लागणार नाहीत, अशी ग्वाही एनसीसीच्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना दिली.

दरम्यान, केजरीवाल यांनी विकासाच्या मुद्यांवर भारतीय जनता पक्षाला घाम फोडल्याचे पाहायला मिळत आहे. झारखंड मधील पराभवानंतर भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची करून तगडी फौज केजरीवालांविरोधात उभी करणार असल्याचं चित्र आहे. त्यासाठी देशभरातील तब्बल २००, खासदार, ७० केंद्रीय मंत्री आणि ११ विद्यमान आणि माजी मुख्यमंत्री दिल्लीमध्ये प्रचारासाठी दाखल होणार आहेत. यावर हे सर्वजण आप’ पक्षाला हरवण्यासाठी मुक्काम ठोकणार असल्याचा जोरदार प्रचार आपच्या वतीने सध्या सुरू झाला आहे. समाज माध्यमांसह विविध ठिकाणी आप’द्वारे भारतीय जनता पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे.

दरम्यान, प्रचाराच्या निमित्ताने महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे नेते दिल्लीत दाखल झाले असून त्यांच्यावर देखील प्रचाराची आणि सभांची जवाबदारी सोपविण्यात आली आहे. महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री आणि भाजप नेते विनोद तावडे दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा प्रचार करण्यासाठी दिल्लीला दाखल झाले आहेत. यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांच्या सभांना मिळणार प्रतिसाद हा महाराष्ट्रातील चावडी सभांपेक्षा देखील कमी असल्याने त्यांच्यावर समाज माध्यमांवर टीका देखील होते आहे.

अरविंद केजरीवाल यांनी एक ट्विट करून माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर टीका केली आहे. केजरीवाल यांनी ट्विटमध्ये म्हटलेय, विनोद तावडे महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री आहेत. त्यांनी महाराष्ट्रात १३०० सरकारी शाळा बंद केल्या आहेत. ते आता दिल्लीत भाजपचा प्रचार करण्यासाठी येत आहेत. माझ्या दिल्लीवासीयांनो, तुम्ही खूप मेहनत करून सरकारी शाळा चांगल्या बनवल्या आहेत. ते आले की त्यांना आपल्या शाळा दाखवा, छोले भटूरे खाऊ घाला आणि दिल्ली दर्शन करून त्यांची रवानगी करा. ते आपले पाहूणे आहेत, अशा शब्दात केजरीवाल यांनी विनोद तावडे यांच्यावर टीका केली आहे.

 

Web Title:  Former Education Minister of Maharashtra Vinod Tawde participate and campaign in Delhi assembly election 2020 for BJP.

हॅशटॅग्स

#Vinod Tawde(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x