26 April 2024 4:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

AXIS बँकेला महाविकास आघाडी सरकारकडून अजून एक धक्का बसणार

Mumbai SRA, AXIS Bank, Amuruta Fadnavis, Mumbai Police

मुंबई:  तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार राज्याच्या मुख्य सचिवांनी परिपत्रक काढून सरकारी कर्मचाऱ्यांची एसबीआय व इतर राष्ट्रीयीकृत बँकांमधील खाती ऍक्सिस बँकेत वळती करण्याचा आदेश दिला, असा आरोप करणारी याचिका मोहनीश जबलापुरे यांनी हायकोर्टात आधीच दाखल केली आहे. त्यावर न्या. प्रदीप देशमुख आणि न्या. पुष्पा गनेडीवाल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली होती.

याचिकेत ऍक्सिस बँकेच्या कॉर्पोरेट अधिकारी अमृता फडणवीस यांनाही प्रतिवादी करण्यात आले. परंतु, अमृता फडणवीस यांचे नाव प्रतिवादी म्हणून वगळण्यात यावे, अशी विनंती याचिकाकर्त्यांच्यावतीने बाजू मांडताना ऍडव्होकेट सतीश उके यांनी केली होती आणि मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने मान्य केली. याचिकेत नमूद मुद्द्यांवर सरकारने अभ्यास करून दोन आठवड्यांत माहिती द्यावी, असे कोर्टाने नमूद केले होते. दरम्यान, जबलापुरे यांनी ऍक्सिस बँकेत सरकारी कर्मचाऱ्यांची खाती वळण्यात आल्याची तक्रार ईडीकडे यापूर्वी केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेचा गैरवापर करत महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची बँक खाती राष्ट्रीय बँकांमधून AXIS बॅंकेत वळवल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात फडणवीस आणि राज्य सरकारवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडवणीस या AXIS बॅंकमध्ये मोठ्या हुद्द्यावर असल्याने बँकेला झुकते माप देत राष्ट्रीय बँकांना तोटा होणारा हा निर्णय घेण्यात आल्याचे या याचिकाकार्त्याने आरोप केले आहेत.

मात्र यापाठोपाठ आता झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे भाडे खाते हे देखील सरकारी बँकेकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या खात्याची रक्कम ही जवळपास ११०० कोटींपर्यंत होती तर झोपडपट्टी पुनर्सवन प्राधिकरणाच्या भाडे खात्याची रक्कम ही ९०० कोटींपर्यंत असल्याचे सांगितले जात आहे.

मुंबई मिरर’च्या वृत्तानुसार मुंबईमध्ये जवळपास ५०० झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प सध्याच्या घडीला सुरू आहेत. या प्रकल्पांसाठी ज्या झोपडपट्टी धारकांची घरे घेण्यात आली आहेत, त्या झोपडपट्टी धारकांना बांधकाम व्यावसायिक दर महिन्याला भाडे देतो. या भाड्याची रक्कम ९०० कोटींपर्यंत आहे. भाड्याची ही रक्कम हे बांधकाम व्यावसायिक या बँकेकडे जमा करत असतात. देवेंद्र फडणवीस सरकारने पोलिसांच्या पगाराची खाती आणि SRA ची भाडे खाती ऍक्सिस बँकेकडे देण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी विरोधात असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने या निर्णयाला विरोध केला होता. फडणवीस यांच्या पत्नी अमृता या ऍक्सिस बँकेत असल्याने या बँकेवर ही मेहेरबानी करण्यात आल्याचं त्यावेळी विरोधकांनी म्हटलं होतं. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले होते.

 

Web Title:  AXIS Bank Maharashtra SRA Rent Deposit Account may transfer to other Bank.

हॅशटॅग्स

#Amruta Fadnavis(82)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x