28 March 2024 2:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल? Reliance Share Price | होय! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पैसे दुप्पट करणार, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राइस जाहीर Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव प्रचंड महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील वाढीव दर तपासून घ्या Zomato Share Price | झोमॅटो शेअरने ब्रेकआऊट दिला, अल्पावधीत मोठी कमाई होणार, पुढील टार्गेट प्राइस जाणून घ्या Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करणारा 42 रुपयाचा शेअर! 1 वर्षात 2400% परतावा दिला, पुढेही मल्टिबॅगर? IRFC Vs RVNL Share | या शेअरने 1 वर्षात दिला 297% परतावा, आता कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉकवर परिणाम होणार? Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीबाबत मोठी अपडेट आली, शेअरवर परिणाम होणार? तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?
x

५ दिवसांचा आठवडा मग पगार ७ दिवसांचा का? मंत्री बच्चू कडू

Minister Bachhu Kadu, 5 days week Maharashtra Government employees

मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 5 दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयानंतर एकीकडे कर्मचारी आनंद व्यक्त करत असतानाच राज्यमंत्री बच्चू कडू यांनी या निर्णयावर निशाणा साधला आहे. ‘पाच दिवसांचा आठवडा मग कर्मचाऱ्यांना 7 दिवसांचा पगार का द्यायचा?’ असा सवाल बच्चू कडू यांनी केला आहे.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याच्या निर्णयावरून बच्चू कडू यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. ”सरकारी कर्मचाऱ्यांना कामकाजासाठी पाच दिवसांचा आठवडा केला तर त्यांना सात दिवसांचा पगार तरी का द्यायचा. सातवा वेतन आयोग आहेच. खरंतर चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी चार दिवसांचा आठवडा केला तरी चालेल.

पण जे २ दिवसही काम न कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा का करायचा. काही कर्मचाऱ्यांच्या टेबलांवरून फाईल महिना महिना पुढे सरकत नाही, अशा कामच न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लाभ का द्यायचे?” असा सवाल कडू यांनी उपस्थित केला आहे.

 

Web Title: Minister Bachhu Kadu criticizes 5 days week Maharashtra Government employees decision.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x