28 March 2024 6:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

शिदोरी मुखपत्र वाद; सत्तेसाठी शिवसेना किती काळ लाचार राहणार? - फडणवीस

Congress Shidori Issue, Savarkar, Devendra Fadnavis, CM Uddhav Thackeray

मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मध्य प्रदेश सरकार आणि काँग्रेसवर सडकून टीका करताना शिवसेनेवरही निशाणा साधला. “काँग्रेसने राष्ट्रपुरुषांना अपमानित करण्याची मालिका सुरु केली आहे. मध्य प्रदेशात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तोडला. तर काँग्रेसचं मुखपत्र ‘शिदोरी’मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांवर अपमानित करणारा लेख लिहिला आहे. याप्रकरणी काँग्रेसने देशाची माफी मागावी”, अशी मागणी फडणवीस यांनी केली. शिवाय सावरकरांचा गौरव राहूद्या पण अपमान तर करु नका, असा अपमान शिवसेना कितपत सहन करणार, असा सवालही फडणवीस यांनी विचारला.

शिदोरी या काँग्रेसच्या मुखपत्रात वीर सावरकर यांच्याविषयी गलिच्छ लिखाण करण्यात आले आहे. काँग्रेसने महापुरुषांच्या अपमानाची मालिकाच सुरु केली आहे. अशा सगळ्या परिस्थितीतही शिवसेना महाराष्ट्रात काँग्रेससोबत सत्तेत आहे. ही लाचारी शिवसेना किती काळ सहन करणार? छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर सावरकर यांचा अपमान केल्या प्रकरणी काँग्रेसने माफी मागावी. भाजपा असे अपमान सहन करणार नाही असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल काँग्रेस पार्टी अशा पद्धतीचं लिखाण करणार असेल, तर भारत देश आणि विशेषतः महाराष्ट्र त्यांना कधीही माफ करणार नाही. शिवसेनेला हे लिखाण मान्य आहे का?, शिवसेनेला हे लिखाण मान्य नसेल तर उद्धवजी काय भूमिका घेणार आहेत. काँग्रेस पक्षानं शिदोरीतले हे लेख मागे घेतले पाहिजे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमींची माफी मागितली पाहिजे. महाराष्ट्रानं शिदोरी या मासिकावर बंदी घालावी, अशी मागणी मी पत्राद्वारे उद्धव ठाकरेंकडे करणार आहे.

दरम्यान, मध्य प्रदेशात अतिक्रमाणाची कारवाई करत असताना छिंदवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा चुकीच्या पद्धतीने हटवल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद भोपाळमध्ये उमटले. यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमल नाथ यांनी शिवरायांचा पुतळा पुन्हा बसविण्याचे आदेश दिले आहेत.

 

Web Title: Opposition Leader Devendra Fadnavis attacks congress and Chief Minister Uddhav Thackeray over Madhya Pradesh Congress statue and Shidori book issue.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x