20 April 2024 12:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

मुंबई: अंधेरी पूर्वेकडील मरोळ एमआयडीसीतील इमारतीला भीषण आग

Huge fire, Rolta company

मुंबई : अंधेरी पूर्व एमआयडीसी परिसरातील रोल्टा टेक्नॉलॉजीज या आयटी कंपनीला भीषण आग लागली. कंपनीच्या दुसऱ्य़ा मजल्यावरील सर्व्हर रुमला आग लागल्याची माहिती आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या २४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तब्बल चार तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. ही आग लेव्हल-४ ची असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.

आग लागलेली इमारत रोल्टा कंपनीची आहे. तीन मजल्याच्या या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या सर्व्हर रूममध्ये साडेअकराच्या सुमारास स्पार्क झाला आणि अचानक आग लागली. संपूर्ण काचेच्या असलेल्या या इमारतीमध्ये कुठल्याही प्रकारचं व्हेंटिलेशन नसल्यानं इमारतीत धूर कोंडला गेला आहे. उष्णता निर्माण झाल्यानं अग्निशमन दलाच्या जवानांना इमारतीत शिरून काही करता येत नाहीए. इमारतीच्या काचा फोडून पाण्याचे फवारे मारले जात आहेत.

आता पर्यंत तब्बल ३० पेक्षा अधिक अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग अटोक्यात आणण्यासाठी अग्नीशमन दलाला शर्तीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. जवानांना ही आग विझवणे अशक्य असल्यामुळे थर्मल इमेजिंग कॅमेरा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आग विझविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

ही इमारत संपूर्ण काचेची इमारत असल्याने यामध्ये हवा खेळती राहत नसल्याने प्रचंड धूर आणि आगीचे लोळ उठत असल्याने आग विझवण्यात अडथळे येत आहेत. दरम्यान, या इमारतीची वीज बंद करण्यात आली आहे. सुदैवानं या इमारतीत कोणताही कर्मचारी अडकलेला नाही. मात्र, मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.

 

Web Title: Huge fire at Mumbai Andheri Rolta company.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x