29 March 2024 5:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

मुख्यमंत्र्यांनी सर्व कागदपत्रं मागवल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी विरोध करणार नाही: चंद्रकांत खैरे

NCP, Congress, Shivsena, Aurangabad, Sambhajinagar

औरंगाबाद : औरंगाबादच्या दौऱ्यावर आलेल्या राज ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी औरंगाबादच्या नामकरण विषयाला देखील हात घातला. त्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ‘औरंगाबादचं नाव बदलले तर काय हरकत? असं म्हणत राज ठाकरे यांनी औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याचा मानस बोलून दाखवला आहे. राज ठाकरे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. यावेळी बोलताना राज ठाकरे यांना शिवसेनेनवर अप्रत्यक्षपणे टीका केली. औरंगाबादचं नामाकरण करणे हा शिवसेनेचा अजेंडा होता? तुम्हीही तोच अजेंडा घेत आहात का? त्यावर बोलताना ते म्हणाले की, औरंगाबादचं नाव बदलले तर काय हरकत? चांगले बदल झाले पाहिजेत. अनेकजण आपली भूमिका बदलून सत्तेत गेले आहेत असं राज ठाकरे म्हणाले.

त्यानंतर या मुद्यावर शांत असलेली शिवसेना हरकत मध्ये आली आहे. यावर माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले की, औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याची मागणी लवकरच पूर्ण होणार आहे. कित्येक दशकांपासून प्रलंबित असलेलं औरंगाबादचं नामांतर अखेर प्रत्यक्षात येणार आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी यासंदर्भात माहिती दिली. औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व कागदपत्रं मागवून घेतली आहेत. उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतल्यानंतर त्यांना काँग्रेस किंवा राष्ट्रवादी कोणीही विरोध करणार नाही असंही चंद्रकांत खैरे यांनी स्पष्ट केलं. औरंगाबादच्या जनतेला थोड्याच दिवसात सुखद धक्का देणार असल्याचं चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे १९८८ पासून औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असाच उल्लेख करत आहेत. शिवसेनेनेच ही मागणी कायम लावून धरली होती. औरंगाबादचं नाव बदलून संभाजी नगर ठेवलं जावं हे तर बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं. त्यामुळे ते स्वप्न उद्धव ठाकरेच पूर्ण करतील इतर कुणालाही ते जमणार नाही” असंही खैरे यांनी म्हटलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

औरंगाबादचं नाव संभाजीनगर करावं ही शिवसेनेची मागणी होती. संभाजीनगर नावाची मागणी मनसे करतेय त्यांनी हा मुद्दा टिकवला पाहिजे. कारण त्यांची धरसोडवृत्ती सर्वांना माहिती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादकरांना लवकरच सरप्राईज देतील. मनसे आता बोलायला लागली आहे. आम्ही आधीपासून संभाजीनगर बोलतो. आता अधिकृतपणे मुख्यमंत्री निर्णय घेतील असा दावा शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

 

Web Title: NCP and Congress will support on renaming of Aurangabad to Sambhajinagar.

हॅशटॅग्स

#Chandrakant Khaire(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x