26 April 2024 3:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

तुझी उंची किती अन तू बोलतो किती; अर्जुन खोतकरांकडून निलेश राणेंची खिल्ली

Shivsena Leader Arjun Khotkar, Former MP Nilesh Rane

जालना: शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखामधून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करण्यात आली आहे. ‘वीर सावरकरांची ढाल, भाजपचा पुळका खोटा’ या मथळ्याखाली प्रसिद्ध अग्रलेखात देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर भाजप नेत्यांना लक्ष्य करण्यात आलं होतं. सावरकर हा विषय भाजपसाठी आदर किंवा श्रद्धेचा विषय नसून राजकारणाचा विषय बनल्याची टीका सामनामधून करण्यात आली होती.

शिवसेनेनं वीर सावरकरांच्या मुद्द्यावरून भाजपावर टीकेचे बाण सोडले होतं. स्वातंत्र्यवीर सावरकरांची ‘ढाल’ करून भाजप हे नवराष्ट्रवादाचे राजकारण खेळते आहे. त्यामुळे शिवसेनेसमोर ‘पेच’ निर्माण होईल असे त्यांना वाटत असेल तर ते भ्रमात आहेत. शिवसेनेसमोर ‘पेच’ निर्माण होणार नाही, पण तुम्ही जे ढोंग उभे केले आहे त्या ढोंगाच्या पेकाटात मात्र नक्कीच लाथ बसेल. भाजपला वीर सावरकरांचा आलेला पुळका खोटा आहे, असे त्यांनी म्हटले होते.

मात्र यावरून भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ट्विट करत प्रतिप्रश्न केला होता. यावर त्यांनी म्हटलं होतं की, “स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात??? की त्यांच्या अगोदर कोण ठाकरे होते??? अटक होऊ नये म्हणून आणीबाणीत स्व. इंदिरा गांधीजीशी मांडवल्ली केली बाळासाहेबांनी तो इतिहास लोकं विसरलेली नाही.

काय आहे नेमकं ट्विट?

त्यावर प्रतिउउतर देताना शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी माजी खासदार निलेश राणे यांची खिल्ली उडवली आहे. यावर बोलताना खोतकर म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने यांना सर्व काही मिळाले असून यांचे नाव लौकिक झाले. असे उपरे लोकं खाल्या मिठाला न जागणारे असतात. त्यामुळे अशा लोकांना गद्दाराशिवाय दुसरी उपमाच आशु शकत नाही. तर तुझी उंची किती अन् तू बोलतो किती, असा खोचक टोलाही खोतकर यांनी निलेश राणेंना लगावला.

 

News English Summery: The BJP and Rashtriya Swayamsevak Sangh have been criticized in the lead-up to the match, which is the mouthpiece of the Shiv Sena. Under the headline ‘Veer Savarkar’s shield, BJP’s Pulaka Khota’, the target was targeted by other BJP leaders including Devendra Fadnavis. Savarkar was criticized by the media for not being a matter of respect or reverence for the BJP but as a matter of politics. Responding to this, Shiv Sena leader Arjun Khotkar has ridiculed former MP Nilesh Rane. Talking about this, Khotkar said that with the blessings of Balasaheb Thackeray, he got everything and his name became famous. Such alien people are not aware of their salt intake. Therefore, such people cannot come by any means other than Gaddar. So Khotkar also asked Nilesh Rane how much your height and how much you talk.

 

Web News Title: Story how much is your height and how much you are talking says Shivsena Leader Arjun Khotkar on Nilesh Ranes twit.

हॅशटॅग्स

#Nilesh Rane(65)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x