29 March 2024 7:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

तर मोदींचे सोशल मीडियावरील करोडो फॉलोअर्स अनाथ होतील: खा. संजय राऊत

Shivsena MP Sanjay Raut, PM Narendra Modi, Modi Bhakta

मुंबई: भाजपच्या कार्यकर्त्यांना सोशल मीडियावर सक्रीय राहण्याचे आदेश देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियापासून दूर राहण्याचा विचार करत आहेत. ट्विटरच्या माध्यमातून मोदींनी सोशल मीडियाला रामराम ठोकण्याचे संकेत दिले आहेत. मोदींनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलंय की, रविवारपासून फेसबुक, ट्विटर, इन्टाग्राम आणि यू-ट्युब सोडण्याचा विचार करत आहे. यासंदर्भातील भूमिका लवकरच स्पष्ट करेन असं म्हटलं आहे.

त्यामुळे मोदी रविवारी नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. मोदींनी दिलेल्या सोशल संन्यासाच्या संकेतांवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खोचक टोला लगावला. मोदींनी सोशल मीडियाचा त्याग केल्यास त्यांचे कोट्यवधी फॉलोअर्स अनाथ होतील, असा चिमटा राऊत यांनी काढला आहे.

तत्पूर्वी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विटर नाही तर द्वेष सोडा असं म्हणत मोदींची खिल्ली उडवली. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी मोदींसह सर्व मोदी भक्तांना देखील समाज माध्यमांवरून बाहेर जा असं आवाहन करत त्यामुळे देश शांत होईल असा खोचक टोला लगावला आहे.

 

News English Summery: Prime Minister Narendra Modi, who ordered BJP workers to be active on social media, is planning to stay away from social media. Through Twitter, Modi has hinted at social media to be rambunctious. Modi has tweeted a tweet about this. In this tweet, he wrote that he was planning to release Facebook, Twitter, Instagram and YouTube on Sunday. It is said that it will clarify its role soon. So everyone is paying close attention to what Modi will say on Sunday. Shiv Sena MP Sanjay Raut took a dig at Modi’s social remarks. Raut has tweeted that Modi would abandon social media if his millions of followers would be orphaned.

 

Web News Title: Story Shivsena MP Sanjay Raut makes sarcastic statement PM Narendra Modis statement about Social Media.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x