19 April 2024 8:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 19 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, अल्पावधीत दिला 85 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
x

YES बँकेला स्थिर करण्यासाठी केंद्र सरकारकडून SBI'चा पर्याय

Finance minister NIrmala Sitharaman, YES Bank Crisis

नवी दिल्लीः पीएमसी बँकेनंतर डबघाईला गेलेल्या येस बँकेवर रिझर्व्ह बँकेने गुरुवारी निर्बंध आणले. आता या बँकेला पुन्हा उभारी देण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाची पावलं उचलली आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन येस बँकेच्या खातेदारांना दिलासा दिला. सर्व खातेदारांचे पैसे सुरक्षित असल्याची ग्वाही सितारामन यांनी दिली. अशातच रिझर्व्ह बँकेनेहे येस बँकेच्या फेररचनेची घोषणा केली. नवी योजना येस बँक आणि एसबीआयला पाठवली आहे. त्यावर त्यांचे मत मागवले आहे, असं रिझर्व्ह बँकेने म्हटलंय.

पुढील एका महिन्यासाठी रिझर्व्ह बँकेने स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी मुख्य वित्तीय अधिकारी प्रशांत कुमार यांची येस बँकेचा प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. येस बँक कोणतेही नवीन कर्ज वितरित करण्यास किंवा गुंतवणूक करण्यास सक्षम राहणार नाही. त्याचबरोबर देशाच्या सर्वात मोठ्या बँक एसबीआयच्या संचालक मंडळाने रोकडसंगतीचा सामना करीत येस बँकेत गुंतवणूक करण्यास ‘तत्वत: मान्यता’ दिली आहे. दरम्यान, आयुष्यभराची जमापुंजी फिक्स्ड डिपॉझिटच्या स्वरुपात बँकेत ठेवली होती. मात्र, आता आपले पैसे परत मिळणार की नाही या चिंतेपोटी खातेदारांची झोप उडाली.

देशातील सर्वात मोठी राष्ट्रीय बँक भारतीय स्टेट बँक (SBI) येस बँकेत मोठी गुंतवणूक करणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री ​निर्मला सीतारमण यांनी शुक्रवारी दिली. ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित असल्याचंही सीतारमँ येस बँकेचे 49 टक्के शेअर्स एसबीआय खरेदी करणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) अधिकृत वेबसाइटवर येस बँकेच्या रिस्ट्रक्चरिंगबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

पुढे सीतारामण म्हणाल्या, “सन २०१७ पासूनच येस बँकेवर रिझर्व्ह बँकेची सातत्याने नजर आहे. चौकशी समिती या संपूर्ण प्रकरणाची विस्तृत तपासणी करेल. २०१९ मध्ये या बँकेवर १ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. तर सप्टेंबर २०१९ नंतर सिक्युरिटी अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) या प्रकरणाची चौकशी करीत आहे.”

 

News English Summery: New Delhi: There has been a huge uproar across the country after the government imposed financial restrictions on Yes Bank. Setting a bidroll limit of Rs 50,000 for the period from March 5 to April 5 has spread fear among the depositors. This bank has been in trouble due to the increasing debt burden. On the other hand, the government has come up with a plan to bring it to the bank. State Bank of India, the largest national bank in the country, will invest heavily in Yes Bank, Union Finance Minister Nirmala Sitharaman said on Friday. SBI will buy 49 per cent shares of Yes Bank in Sitaram despite the depositors’ deposits being secured, the finance minister told a press conference. The official website of the Reserve Bank of India (RBI) has detailed information about the restructuring of this bank.

 

News English Title: Story YES bank crisis finance Minister Nirmala Sitaraman assured account holders that money will be safe.

हॅशटॅग्स

#Nirmala Sitharaman(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x