29 March 2024 9:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 30 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर?
x

नेहमीप्रमाणे काही कारस्थानी काँग्रेसवाल्यांनीच सिंधिया यांची कोंडी केली असावी...

BJP Leader Nilesh Rane, Jyotiraditya Scindia, quits congress party

मुंबई: मध्य प्रदेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी मंगळवारी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर त्यांचे राजीनाम्याचे पत्र समोर आले. ज्योतिरादित्य शिंदे बुधवारीच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

कमलनाथ आणि सिंधिया यांच्यात कलह इतका वाढला की ज्योतिरादित्य सिंधिया यांनी कॉंग्रेसचा राजीनामा दिला. सिंधिया मंगळवारी सकाळी अमित शहा यांना भेटायला गेला आणि त्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. एक तासाच्या बैठकीनंतर सिंधिया बाहेर आले. सिंधिया भाजपमध्ये सामील होतील आणि त्यांना राज्यसभेवर पाठविण्यात येईल. त्याचबरोबर त्यांना केंद्रात मंत्री केले जाईल अशी माहिती समोर आली.

मध्यप्रदेशात काँग्रेस सरकारवर आलेल्या ज्योतिरादित्य संकटामुळे मुख्यमंत्री कमलनाथ यांचं सरकार अडचणीत आलं आहे. काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर त्याचे समर्थक असलेल्या काँग्रेसच्या २२ आमदारांनी सुद्धा मुख्यमंत्री कलनाथ यांच्याकडे राजीनामे सोपवले. यामुळे सरकार अल्पमतात आलं आहे. काँग्रेस श्रेष्ठींनी ज्योतिरादित्य शिंदे यांचा राजीनामा मंजूर करताच त्यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेटही घेतली.

मात्र या घडामोडींवरून आणि काँग्रेसमधील वरिष्ठ पातळीवरील राजकारणावरून भाजप नेते निलेश राणे यांनी काँग्रेसवर शंका व्यक्त करणारं ट्विट केलं आहे. त्या ट्विट’मध्ये निलेश राणे यांनी म्हटलं आहे की, “ज्योतिरादित्य सिंधिया काँग्रेस सोडणार म्हणजे राहुल गांधीचं हे सर्वात मोठ अपयश आहे. सहजासहजी सिंधिया राहुल गांधीला सोडेल हे कोणालाही खरं वाटणार नाही पण नक्कीच नेहमीप्रमाणे काही कारस्थानी काँग्रेसवाल्यांनी एका चांगल्या नेत्याची कोंडी केली असावी”.

 

News English Summery: Chief Minister Kamal Nath’s government is in trouble due to the Jyotiraditya crisis on the Congress government in Madhya Pradesh. After Congress leader Jyotiraditya Shinde resigned, the 22 MLAs who were his supporters also submitted their resignations to Chief Minister Kalnath. This has left the government in a dilemma. He also met Prime Minister Narendra Modi and Union Home Minister Amit Shah in New Delhi when Congress clerics approved the resignation of Jyotiraditya Shinde. But from these developments and from senior level politics in the Congress, BJP leader Nilesh Rane has tweeted to express his doubts over the Congress. In that tweet, Nilesh Rane said, “Jyotiraditya Scindia will leave Congress, which is Rahul Gandhi’s biggest failure. Nobody will be sure that Scindia will leave Rahul Gandhi with ease, but of course, as usual, some Congressmen may have been created such situation against a good leader.”

 

Web News Title: Story BJP Leader Nilesh Rane comment over Jyotiraditya Scindia quits congress party.

हॅशटॅग्स

#Nilesh Rane(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x