20 April 2024 4:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Godawari Power Share Price | अवघ्या 3 वर्षात 339% परतावा देणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राइस जाहीर, वेळीच फायदा घ्या Jubilant Pharmova Share Price | अल्पावधीत करा मोठी कमाई! हा शेअर देईल 70 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स पुन्हा बुलेट ट्रेन तेजीत वाढणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट Multibagger Stocks | असा स्वस्त शेअर निवडा! किंमत 32 रुपये, अल्पावधीत दिला 2500 टक्के परतावा, खरेदी करणार? Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार? Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर चार्टनुसार 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

मोदींची स्तुति करत ज्योतिरादित्य शिंदे यांचा भाजपात प्रवेश

PM Narendra Modi, BJP Leader Jyotiraditya Scindia

नवी दिल्ली: मध्य प्रदेशातील राजकीय भूकंप आणत काँग्रेसला धक्का देणारे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजप मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, मंत्री धर्मेंद्र प्रधान, उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे उपस्थित होते. ज्योतिरादित्य शिंदे उद्या भोपाळला जाणार असून ते १३ मार्चला राज्यसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या येण्याने आम्हाला आनंद होत असून त्यांना पक्षात मुख्य प्रवाहात काम करण्याची संधी मिळेस असे पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणाले.

पुढे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले, नरेंद्र मोदी यांना एकदा नव्हे दोनदा जो जनादेश मिळाला आहे तो याआधी कोणालाही मिळाला नव्हता. सक्रीय, समर्पित वृत्तीने काम करण्याच्या मोदींच्या वृत्तीमुळे संपूर्ण जगभरात आज भारताचे नाव झाले आहे. कोणत्याही योजनेची अंमलबजावणी कार्यक्षमतेने करण्याचे काम भाजप सरकारकडून केले जात आहे. त्यामुळेच भारताचे भविष्य नरेंद्र मोदींच्या हातात सुरक्षित आहे.

कमलनाथ आणि सिंधिया यांच्यात कलह इतका वाढला की ज्योतिरादित्य सिंधिया यांनी कॉंग्रेसचा राजीनामा दिला होता. सिंधिया मंगळवारी सकाळी अमित शहा यांना भेटायला गेले आणि त्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. एक तासाच्या बैठकीनंतर सिंधिया बाहेर आले. सिंधिया भाजपमध्ये सामील होतील आणि त्यांना राज्यसभेवर पाठविण्यात येईल. त्याचबरोबर त्यांना केंद्रात मंत्री केले जाईल अशी माहिती समोर आली होती.

मध्यप्रदेशात काँग्रेस सरकारवर आलेल्या ज्योतिरादित्य संकटामुळे मुख्यमंत्री कमलनाथ यांचं सरकार अडचणीत आलं आहे. काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर त्याचे समर्थक असलेल्या काँग्रेसच्या २२ आमदारांनी सुद्धा मुख्यमंत्री कलनाथ यांच्याकडे राजीनामे सोपवले. यामुळे सरकार अल्पमतात आलं आहे. काँग्रेस श्रेष्ठींनी ज्योतिरादित्य शिंदे यांचा राजीनामा मंजूर करताच त्यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेटही घेतली.

 

News English Summery: Veteran leader Jyotiraditya Shinde has joined the Bharatiya Janata Party, triggering a political earthquake in Madhya Pradesh. Union Home Minister Amit Shah and BJP President JK Singh will address the program at BJP headquarters. P. Nadda, Minister Dharmendra Pradhan, Vice President Vinay Sahasrabuddhe were present. Jyotiraditya Shinde is scheduled to go to Bhopal tomorrow and will fill out his nomination form for Rajya Sabha election on March 13. We are delighted to have Jyotiraditya Shinde come and give him the opportunity to work mainstream in the party. P. Said Nadda. Talking further to the media, Jyotiraditya Shinde said that no one had ever received the mandate that Narendra Modi received not once but twice. Modi’s attitude of working with an active, dedicated attitude has made India a worldwide name today. BJP government is working to implement any plan efficiently. That is why India’s future is secure in the hands of Narendra Modi.

 

Web News Title: story India is safe in the hands of PM Narendra Modi says Jyotiraditya Scindia.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x