29 March 2024 3:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर? IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?
x

शिवजयंती ३६५ दिवस साजरी व्हायला हवी; आपले सर्व सण तिथीनुसारच

MNS Chief Raj Thackeray, Aurangabad Shiv Jayanti Utsav, Sambhajinagar

औरंगाबाद, १२ मार्च : औरंगाबादमध्ये आज मनसेचा शिवजयंती उत्सव सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे यांनी, ३६५ दिवस शिवजयंती साजरी व्हायला हवी असं म्हटलंय. कोणताही सण तारखेनुसार नसतो. हिंदू संस्कृतीनुसार तिथीनुसार सर्व सण साजरे होत असतात. शिवजयंती हा एक सण आहे. त्यामुळे हा सणही तिथीनुसारच साजरा केला जावा, असं राज ठाकरे म्हणाले.

पुढे बोलताना राज ठाकरेंनी हा उत्सव दिमाखात साजरा कराल अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली. तसंच शोभायात्राही उत्साहात पार पडेल अशी आशा असल्याचं म्हणाले. शिवजयंती साजरी होत असताना गालबोट लागणार नाही याची काळजी घ्या असं आवाहन यावेळी त्यांनी केलं. करोनासंबंधी बोलताना राज ठाकरेंनी आधीच या देशात रोगराई आहे त्यात अजून एक वाढला तर काय फरक पडतो असं म्हटलं. काळजी घेतली पाहिजे यात काही वाद नाही. महाराष्ट्रात कोणाला लागण होता कामा नये अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली.

अशा कुठल्याही गोष्टीची लागण महाराष्ट्रात होता कामा नये. याची लागण काही जणांना झाली आहे, पण तेसुद्धा बरे होतील. स्वतःची तुम्ही काळजी घेणं आवश्यक आहे. हा उत्सव तुम्ही दिमाखात साजरा कराल, संध्याकाळची शोभायात्राही मोठ्या थाटात पार पाडाल, मला याची खात्री आहे. त्याला कोणतंही गालबोट लागणार नाही, याची काळजी घ्या, असंही आवाहनही राज ठाकरेंनी मनसैनिकांना केली आहे. तसेच शिवजयंती तिथीनुसार साजरी करायची की तारखेनुसार यासंदर्भातही राज ठाकरेंनी परखडपणे आपलं मत व्यक्त केलं आहे.

 

News English Summery: MNS president Raj Thackeray has said that Shiv Jayanti should be celebrated in Maharashtra for 365 days. According to the date, Raj Thackeray arrived in Aurangabad to celebrate Shiv Jayanti. Today, in the presence of activists, he celebrated Shiv Jayanti. Speaking at this time, he said that the Maharaja’s birth anniversary should be celebrated like that. Speaking on the issue as to whether Shiv Jayanti should be celebrated on the date, Raj Thackeray said, “I went to Jayant Salgaonkar a few years back. They asked me if I wanted to celebrate the date of Shiv Jayanti. He said that it would take 365 days. But to be told why, according to dates, we do what we celebrate all year long. No festival is celebrated on a date. Maharaj’s birth anniversary is a festival for us. So it should be celebrated like a festival.

 

Web News Title: Story MNS Chief Raj Thackeray in Aurangabad for Shivjayanti Utsav Sohala.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x