25 April 2024 4:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार? Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्स खरेदीला गर्दी, अवघ्या 4 वर्षात 1 लाख रुपयांवर दिला 21 लाख रुपये परतावा Amara Raja Share Price | मार्ग श्रीमंतीचा! हा शेअर खरेदी करा, अवघ्या 5 दिवसात दिला 33 टक्के परतावा
x

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रेक्स टिलरसन यांची हकालपट्टी

वॉशिंग्टन : अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रेक्स टिलरसन यांची ट्रम्प प्रशासनाने हकालपट्टी केली असून तसे अधिकृत ट्विट करून खुद्द राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या निर्णयाची माहिती दिली आहे. त्यांच्या जागी सीआयएचे अध्यक्ष माईक पॉम्पीओ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रेक्स टिलरसन यांच्यात अनेक दिवस काही विषयांवरून एकवाक्यता नव्हती. तसेच या वादाचेच पडसाद म्हणून त्यांना एक्झॉन मोबील सारख्या महाकाय तेल कंपनीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आमच्यात एकवाक्यता नव्हती याची कबुली सुद्धा स्वतः ट्रम्प यांनी जाहीरपणे बोलून दाखवली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या अधिकृत ट्विट अकाउंट वरून त्यांनी अशी माहिती दिली आहे कि, सीआयएचे अध्यक्ष माईक पॉम्पीओ हे अमेरिकेचे नवनियुक्त परराष्टमंत्री असतील. माईक पॉम्पिओ हे चांगली कामगिरी करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली असून रेक्स टिलरसन यांनी दिलेल्या सेवेबद्दल सुद्धा आभार प्रकट केले आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जीना हास्पेल यांची सीआयएच्या अध्यक्षपदी नियुक्ती केल्याचे जाहीर केले आहे. या पदावर नियुक्त होणाऱ्या त्या पहिला अमेरिकन महिला ठरल्या आहेत.

हॅशटॅग्स

#Donald Trump(89)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x