19 April 2024 11:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत महिना SIP करा, हमखास 12 लाख रुपये परतावा मिळेल BYD Atto 3 | खुशखबर! आता BYD Atto 3 ई-कारला नो वेटिंग, झटपट डिलिव्हरी मिळणार, प्राईससह फीचर्स जाणून घ्या ICICI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा! महिना 10,000 रुपयांच्या SIP ने मिळेल 78.32 लाख रुपये परतावा, स्कीम लक्षात ठेवा Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील
x

पक्षात जुन्या नेत्यांचीही गरज असते, पण मी त्यासाठी पक्षाकडे जाणार नाही: चंद्रकांत खैरे

Former MP Chandrakant Khaire, Priyanka Chaturvedi, Aaditya Thackeray

मुंबई, १२ मार्च: लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचा हात सोडून शिवबंधन बांधणाऱ्या प्रियांका चतुर्वेदी यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यसभेतल्या ५५ जागांसाठी मार्च अखेरीस मतदान होत आहे. यात राज्यातल्या ७ जागांचा समावेश आहे. एप्रिल महिन्यात होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेत चुरस पाहायला मिळत होती. लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या प्रियंका चतुर्वेदी संसदेत पाऊल ठेवण्यास इच्छुक होत्या. मात्र लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले शिवसेनेतील जुनेजाणते नेतेही शर्यतीत असले तरी शिवसेनेकडून प्रियांका चतुर्वेदी या नावांवर शिक्कामोर्तब होणार असल्याचं वृत्त महाराष्ट्रनामा न्यूज’ने काही दिवसांपूर्वी दिलं होतं.

त्यादृष्टीने चतुर्वेदींनी प्रयत्न सुरु केल्याचीही माहिती होती. विशेष म्हणजे प्रियंका चतुर्वेदी या पर्यावरण-पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. चतुर्वेदींनी थेट आदित्य ठाकरे यांच्यामार्फत ‘फील्डिंग’ लावल्याने राज्यसभेच्या एका जागेच्या शर्यतीत त्या सर्वात पुढे होत्या.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या ‘आदित्य संवाद’ या इव्हेंटमध्ये प्रियांका चतुर्वेदी यांची प्रमुख भूमिका होती आणि त्या सतत आदित्य ठाकरे यांच्यासोबत असल्याचं पाहायला मिळालं होतं . नुकतीच आदित्य ठाकरे यांनी दिल्लीतील फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या कार्यालयांना भेट दिली होती आणि त्यावेळी देखील प्रियांका चतुर्वेदी उपस्थित होत्या. दिल्लीत पक्षाची इमेज बिल्डिंग करण्याच्या दृष्टीने पारंपरिक उमेदवारांना बगल देत, हिंदी, इंग्लिश अशा भाषांवर प्रभूत्व असणाऱ्या आणि सर्वच पक्षांना परिचित असणाऱ्या प्रियांका चतुर्वेदी यांच्यासाठी स्वतः आदित्य ठाकरे पुढाकार घेण्याची शक्यता होती.

परंतु, चतुर्वेदींच्या उमेदवारीनंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा औरंगाबादचे माजी खासदार आणि उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. खासदारकीची मला आवश्यकता नव्हती पण माझ्या मराठवाड्याला माझी गरज होती. मागील २० वर्षे मी लोकसभा गाजवली. परंतु, प्रियांका चतुर्वेदी चांगलं काम करतील. त्या इंग्रजी चांगल्या बोलतात, असा टोला त्यांनी लगावला.

राज्यसभेची संधी मिळाली असती तर लढण्यासाठी बळ मिळाले असते. पक्षात जुन्या नेत्यांचीही गरज असते. मी बाळासाहेबांचा कडवट सैनिक आहे. मी यासाठी पक्षाकडे जाणार नाही. पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावले तरच मी त्यांच्याकडे जाईन, असेही ते म्हणाले. औरंगाबादेत मी मुसलमानांविरोधात उभा राहिलो. आजही एकट्याच्या जोरावर महापालिका निवडणुका जिंकेन. पक्षाला सत्तेवर आणून दाखवेल, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 

News English Summery: Priyanka Chaturvedi’s nomination for Rajya Sabha has been announced on behalf of the Shiv Sena. But after the Chaturvedi nomination, the senior Shiv Sena leader and former Aurangabad MP and openly expressed his displeasure. I didn’t need the MP but my marathon house needed me. For the past 20 years, I have attended the Lok Sabha. But, Priyanka Chaturvedi will do well. He insisted that they speak English well. He added that if the Rajya Sabha had been given the opportunity, it would have been a force to fight. The party also needs old leaders. I am a bitter soldier of Balasaheb. I will not go to the party for this. I will go to him only if the party chief and the chief minister call Uddhav Thackeray, In Aurangabad I was up against Muslims. Even today, the municipality will win elections alone. He also expressed strong belief that the party would come to power.

 

Web News Title: Story former MP Chandrakant Khaire slams on Priyanka Chaturvedis candidature for Rajya Sabha election 2020 from Shivsena.

हॅशटॅग्स

#Chandrakant Khaire(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x