29 March 2024 2:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

'तो' शब्द भाजप पक्षातील नेत्यांकडूनच फिरवला गेला: सुधीर मुनगंटीवार

Shivsena, Sudhir Mungantiwar, Yuti

मुंबई, १३ मार्च : विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपमध्ये आम्ही जे काही ठरविले होते, त्यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फारकत घेतली. त्यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी फारकत घेतली, असं धक्कादायक विधान माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे.

राज्याच्या अर्थसंकल्पावरील चर्चेत मुनगंटीवार बोलत होते. राजकीय संदर्भ देताना ते म्हणाले, ‘शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी ठरले होते तो शब्द आम्ही पाळला असता, तर आज शिवसेनेसोबत आमची सत्ता असती. आम्ही त्यांना फसवले, आमची चूक झाली. आमच्या चुकीचा फायदा तुम्हाला झाला. पण एक ना एक दिवस ती चूक आम्ही सुधारू.’

मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजप अध्यक्ष अमित शहा व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात जे ठरले तो शब्द आमच्याच पक्षातील नेत्यांकडून फिरवला गेला. नाहीतर आज शिवसेनेसोबत आम्ही सत्तेत असतो. आम्ही त्यांना फसवले ही आमची चूक झाली. आमच्या चुकीचा फायदा तुम्हाला झाला. पण एक ना एक दिवस ती चूक आम्ही सुधारू, असं ते यावेळी म्हणाले.

आम्ही शिवसेनेला फसविले, पण तुम्ही याचा एवढा गैरफायदा घेऊ नका असे त्यांनी राष्ट्रवादी- काँग्रेसला सुनावले. एवढेच नव्हे तर तुमचे तीन महिन्यापासूनचे संबंध असून आमचे ३० वर्षांचे संबंध असून महाविकास आघाडी सरकारचे आता १०० दिवस पूर्ण झाले आहेत. या सरकारचे १०० अपराध पूर्ण झाल्यानंतर हे सरकार कोसळेल, असे भाकीतही त्यांनी यावेळी वर्तविले.

 

News English Summery: The word which was passed on Matoshree between Shiv Sena party chief Uddhav Thackeray, BJP president Amit Shah and opposition leader Devendra Fadnavis was revoked by the leaders of our party. Otherwise today we are in power with the Shiv Sena. It is our fault that we have deceived them. You have benefited the wrong way. But one day we will correct that mistake, he said at this time. You will have a three-month friendship with Chief Minister Uddhav Thackeray, but our friendship is almost 30 years old, said former Finance Minister Sudhir Mungantiwar. The Shiv Sena and BJP alliance government could not come to Maharashtra. In the political drama of that time, development was established by leading the development. After this, the statement of former Finance Minister Sudhir Mungantiwar is being discussed in the political circles.

 

Web News Title: Word was diverted by the BJP leaders says Sudhir Mungantiwar over breaking alliance with Shivsena.

हॅशटॅग्स

#Sudhir Mungantiwar(28)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x