18 April 2024 11:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 19 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, अल्पावधीत दिला 85 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
x

शिवसेनेकडून सरकारच्या नियमावलीचे उल्लंघन; मिसळ महोत्सवाचे आयोजन; मनसेकडून प्रश्न

Shivsena Thane, Misal Mahotsav, CM Uddhav Thackeray, MNS Sandeep Panchange, News Latest Updates

ठाणे, १४ मार्च: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर आणि पिंपरी-चिंचवड येथील शाळा पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. जनतेच्या हितासाठी खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले. याबाबत घेतलेले निर्णय काल मध्यरात्रीपासून लागू होणार असल्याचेही त्यांनी म्हटले. दहावी आणि बारावीची परीक्षा वगळता शालेय परीक्षा उशिरा घेण्याबाबतही विचार सुरु असल्याचे ते म्हणाले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत करोनाबाबतचं निवेदन दिलं. राज्यात करोनाचे एकूण १७ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी दहा रुग्ण पुण्यातील आहेत. मात्र, या १७ रुग्णांमधील करोनाची लक्षणं गंभीर नाहीत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. तसेच मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर येथील जिम, सिनेमागृहे, जलतरण तलाव, नाट्यगृहे आज मध्यरात्रीपासून बंद करण्यात येत असल्याची घोषणा त्यांनी केली. करोनाचा राज्यात फैलाव नाही. मुंबई, ठाणे, नागपूर आणि पुण्यातही नाही. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात येत आहे. पुढचे १४ दिवस काळजी घ्यायला हवेत, म्हणून निर्णय घेतला असल्याचंही त्यांनी सांगितलं.

मात्र मुख्यमंत्र्यांचे आदेश ठाण्यातील शिवसैनिकच धाब्यावर बसवत असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण ठाण्याच्या वर्तकनगर, शिवाईनगर परिसरातील शिवसैनिक दिशा ग्रुपचे भास्कर बैरीशेट्टी आणि त्यांच्या शिवसेनेच्या नगरसेविका असणार्‍या पत्नी रागिणी बैरीशेट्टी यांच्या आशीर्वादाने पोखरण रोड येथील उन्नती गार्डन मैदानावर शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश झुगारून ३ दिवसीय मिसळ महोत्सवाचे आयोजन केले आहे. त्याचे शहरभर होर्डिंग लावत दिमाखदार उद्घाटनही झाले असून परिसरात नेहमी सामाजिक कार्य करणार्‍या दिशा ग्रुपच्या बैरीशेट्टी दाम्पत्याकडून तरी ‘कोरोनाचे’ सावट असताना नागरिकांचे जीव धोक्यात घालणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा निर्धार केल्याचं दिसतं.

एकीकडे हिंदू नववर्षाच्या स्वागताचा मानबिंदू असणार्‍या जिल्ह्यातील गुढीपाडव्याच्या निमित्ताने शोभायात्रांवर जिल्हाधिकार्‍यांनी बंदी घातलेली असताना व सातारा जिल्ह्यातील बावधनच्या पारंपारिक ‘बगाड’ यात्रेच्या आयोजनानिमित्त संबंधितांवर ‘कोरोना’ नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी खुद्द जिल्हाधिकारी कारवाईच्या तयारीत असताना ठाण्यातील अशा मिसळ महोत्सवावर जिल्हाधिकारी नेमकी काय कारवाई करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी दिली आहे.

 

News English Summery: Chief Minister Uddhav Thackeray on Friday informed the state government that the state government has decided to shut down schools in Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai, Nagpur and Pimpri-Chinchwad in the wake of the corona virus. He said the decision was taken as a precaution in the interest of the people. He said that the decisions taken in this regard would be implemented from midnight tomorrow. He said the idea was to start the school exams late, except for the Class X and XII exams. Chief Minister Uddhav Thackeray made a statement in the Legislative Assembly today. A total of 17 coronary patients have been found in the state. Ten of them are from Pune. However, in these 17 patients, the symptoms of coronary disease are not severe. They are undergoing treatment, Chief Minister Uddhav Thackeray said. He also announced that the gyms, cinemas, swimming pools and theaters in Nagpur, Mumbai, Navi Mumbai, Thane, Pimpri Chinchwad and Nagpur will be closed from midnight onwards. There is no spread in the state of Corona. Not in Mumbai, Thane, Nagpur and even in Pune. However, this decision is being taken as a precautionary measure. The next 14 days have to be taken care of, he said.

 

Web News Title: Story Shivsena party workers organised Misal Mahotsav even after Chief Minister Uddhav Thackeray orders about Corona Virus precautions News Latest Updates.

हॅशटॅग्स

#AmitThackeray(28)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x