25 April 2024 6:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

कोरोना: घरी कॉरंटाईन केलेल्या व्यक्तीच्या डाव्या हातावरील शिक्का असा आहे

News Latest updates, Corona Virus, home quarantined people, stamp on left hand

मुंबई: राज्यातील कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक उपाय योजना करण्यात येत आहेत. परदेशातून परतल्यानंतर ज्यांना १०० टक्के घरी क्वॉरंटाईनच्या सूचना देण्यात आल्या आहेत त्यांच्या डाव्या हातावर शिक्का मारण्यात येत आहे. समाजात या व्यक्ती वावरताना आढळल्यास त्याची ओळख पटावी, यासाठी त्यांच्या डाव्या हातावर खास शिक्का उमटवण्याच्या सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील पत्रकार परिषदेत यासंदर्भातील माहिती देखील दिली आहे.

मुंबईपाठोपाठ आता नवी मुंबईतही कोरोनाव्हायरसचा नवा रुग्ण आढळून आला आहे, ज्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 39 वर पोहोचली आहे. आज दिवसभरात राज्यात मुंबईत ४, यवतमाळमध्ये एक आणि नवी मुंबईत एक असे एकूण ६ नवे रुग्ण आढळून आलेत. राज्यात कोणत्या ठिकाणी कोरोनाव्हायरसचे किती रुग्ण आहेत, याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट केलं आहे.

राज्यात कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनाचे ३८ जण रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्व स्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच आता घरी क्वॉरेंटाईन केलेल्या लोकांच्या हातावर शिक्का मारण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले होते. घरी क्वारंटाइन केलेल्या लोकांच्या हातावर एक विशिष्ट शिक्का मारण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली होती. शिक्का मारल्यानंतर हे लोक बाहेर दिसले तर, ते घरी क्वारंटाइन आहेत हे कळू शकेल. अशा लोकांनी घरातच राहावे, असंही टोपे यांनी सांगितलं होते.

तसेच सरकारी कार्यालयांमधील बायोमेट्रिक प्रणालीचा वापर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनाकडून सोमवारी यासंदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आले. त्यामुळे उद्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांना हजेरी पटावर उपस्थिती नोंदवावी लागणार आहे.

 

News English Summery: Various measures are being taken by the state government to control the spread of corona virus infection in the state. Those who have been given quarantine instructions 100 per cent of their homes after returning from abroad are being stamped on their left hand. The state government has given a special stamp on his left hand so that he can be identified when he is found in the community. Chief Minister Uddhav Thackeray also informed about this at a press conference.

 

News English Title: Story Corona Virus see home quarantined people will get such stamp on left hand News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x