28 March 2024 10:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मुंबईत धावणारी एसी लोकल उद्यापासून बंद - पश्चिम रेल्वे

Western Railway, AC Train Cancelled, Corona Virus Crisis

मुंबई, १९ मार्च:  राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने वाढत चालला आहे. कोरोनाबाधितांच्या आकड्यात वाढ होत ४९ वर येऊन पोहचला आहे. अशामध्ये सरकारकडून वारंवार आवाहन करुन देखील गर्दी कमी होत नाही. त्यामुळे गर्दी कमी करण्यासाठी नाईलास्तव लोकल बंद करावी लागेल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मुंबईत धावणारी एसी लोकल उद्यापासून बंद करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. पुढील आदेश येईपर्यंत ही लोकल सेवा बंद राहणार आहे. तसेच ट्रान्स हार्बरवरील एसी लोकल देखील उद्यापासून ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. एसी लोकलमधून प्रवास करताना कुणालाही कोरोनाची लागण होऊ नये, नागरिकांनी गर्दीतून प्रवास करणं टाळावं यासाठी ही सेवा बंद करण्यात येत असल्याचं रेल्वे सूत्रांनी सांगितलं. एसी लोकल बंदिस्त असते, त्यामुळे एखाद्याच्या शिंकण्यामुळे बाहेर पडणारे जंतूंना लोकलच्या बाहेर पडण्यास वाव नसतो. त्यामुळे त्याचा कुणालाही संसर्ग होऊ शकतो. शिवाय एसी लोकलचं तापमान अत्यंत कमी असल्याने संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे एसी लोकल बंद करण्यात आल्याचंही सूत्रांनी सांगितलं.

दरम्यान, ठाणे-वाशी मार्गावर लोकलच्या रांगा लागल्या असून बऱ्याच वेळापासून दोन्ही प्लॅटफॉर्मवर गाड्या उभ्या आहेत. तर दोन लोकल ठाणे स्थानकाजवळ रुळांवर थांबलेल्या आहेत. प्रवाशांनी रुळांवर उड्या टाकून चालत जाणे पसंद केले आहे. अचानक ब्लॅाक घेतल्याने ही परिस्थिती उद्भवली होती. अर्ध्यातासाने वाहतूक सुरु झाली आहे. कालही अचानक अर्धा तास ब्लॉक घेतला होता.

 

News English Summery:  Western Railway has decided to close the AC locality running from Mumbai tomorrow to prevent the spread of corona. This local service will be closed until further orders. Also, AC locals on Trans Harbor will be closed from tomorrow until March 31. Train sources said that no one should be affected by coronas while traveling through AC locality. The AC locale is closed, so the germs that are left by one’s sneezing have no chance of getting out of the locale. It can cause infection to anyone. In addition, the AC local temperature is very low, and it is more likely to be infected. Sources said that AC locals were closed. Meanwhile, local queues have been set up on the Thane-Vashi route. Two locals are stationed at the station near Thane station. Passengers like to jump on the rules. This situation was triggered by a sudden blackout. Half the traffic has started. The block was taken suddenly for half an hour yesterday.

 

News English Title:  Story ac local train services on western railway in Mumbai will be cancelled from tomorrow due to Corona Crisis News Latest Updates.

हॅशटॅग्स

#railway(18)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x