19 April 2024 10:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मध्य प्रदेशात आज बहुमत चाचणी

Madhya Pradesh, Supreme Court, CM Kamal Nath

नवी दिल्ली, १९ मार्च:  ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या बंडाळीमुळे अस्थिर झालेल्या कमलनाथ सरकारला आज बहुमत सिद्ध करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे आज शुक्रवारी मध्य प्रदेश विधानसभेत काँग्रेस सरकारला अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. यापूर्वी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मध्य प्रदेश विधानसभेत कमलनाथ सरकारकडून विश्वासदर्शक ठराव मांडला जाणे अपेक्षित होते. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पीय अधिवेशन २६ मार्चपर्यंत स्थगित केले होते. यानंतर भाजपने न्यायालयात धाव घेतली होती.

भाजपने दाखल केलेल्या याचिकेनंतर सर्वोच्च न्यायालयाने आजच फ्लोअर टेस्ट होणार असल्याचा निर्वाळा दिला आहे. राज्यपाल लालजी टंडन यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांना १७ मार्चला फ्लोअर टेस्ट घेऊन बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं होतं. मात्र, विधानसभाध्यक्षांनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर १७ मार्चला विधानसभेचं कामकाज २६ मार्चपर्यत स्थगित केल्याची घोषणा केली. असं असताना विधानसभेत फ्लोअर टेस्‍टची कोणतीही तयारी करण्यात आली नव्हती.

बहुमत चाचणीसाठी जे मतदान होईल ते हात उंचावून होईल. त्यामुळे कोण कुणाला मतदान करतंय हेदेखील स्पष्ट होईल. विधानसभेच्या या कामकाजाचं व्हिडिओ रेकॉर्डिंगदेखील होणार आहे. बहुमत चाचणी दरम्यान संबंधीत कायदेव्यवस्था कायम राहील हे सुनिश्चित करण्याचे आदेशही न्यायालयानं दिलेत.

 

News English Summery:  The Supreme Court today ordered the Kamal Nath government to prove its majority after the Jyotiraditya Scindia uprising. Therefore, the Congress government will face a fire test in the Madhya Pradesh Assembly on Friday. Earlier on the first day of the budget session, the Madhya Pradesh Legislative Assembly was expected to make a credible resolution by the Kamal Nath government. However, the Speaker of the Assembly had postponed the budget session until March 26 in the wake of Corona. The BJP had then rushed to court. After a petition filed by BJP, the Supreme Court has ruled that the floor test will be held today. Governor Lalji Tandon had asked Chief Minister Kamal Nath to prove his majority by taking a floor test on March 17. However, the Legislative Assembly announced on March 17 that the assembly would be suspended until March 26 in the wake of the Corona virus. There was no preparation for floor test in the assembly.

 

News English Summery:  Story Madhya Pradesh Supreme Court decision on political crisis floor test News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x