29 March 2024 12:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर दैनिक चार्टवर ट्रेंड लाइन ब्रेकआउट देत आहे, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स स्टॉकबाबत तज्ञ उत्साही, नवीन टार्गेट प्राइस जाहीर, किती परतावा मिळणार? Bonus Share News | सुवर्ण संधी! ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, वेळीच एन्ट्री घेऊन फायदा घेणार? IFCI Share Price | शेअरची किंमत 39 रुपये! IFCI शेअर चार्ट पॅटर्नमध्ये सकारात्मक वाढीचे संकेत, यापूर्वी 350% परतावा दिला Infosys Share Price | इन्फोसिस शेअरला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, या पातळीवर टिकल्यास अल्पावधीत उच्चांक किंमत स्पर्श करणार
x

कोरोना आपत्तीवर योग्य निर्णय...मेल, एक्स्प्रेस, पॅसेंजर ट्रेन ३१ मार्चपर्यंत बंद

No Train Except, Corona Virus

मुंबई, २२ मार्च : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी मध्यरात्रीपासून मालवाहतूक वगळता सर्व प्रवासी वाहतूक तूर्त बंद राहणार आहे. ३१ मार्चपर्यंत लांब पल्ल्याची रेल्वे वाहतूक रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. रेल्वेने घेतलेला हा निर्णय देशाची वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेने होताना दिसते आहे. यापूर्वी कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे अनेक ट्रेन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, दिवसेंदिवस देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने मोठे पाऊल उचलत संपूर्ण रेल्वे सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोना व्हायरस देशभर पसरू नये, म्हणून केंद्र सरकारने वाहतूक व्यवस्था बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं दिसत आहे. मात्र कोरोनाने सध्या साऱ्या जगात धुमशान घातले आहे. भारतातही मोठ्या वेगाने हा विषाणू पसरत आहे. भारतात कोरोना दुसऱ्या टप्प्यात असला तरी, देशात 300हून अधिक रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. या सगळ्यात केंद्रीय आरोग्य विभागाचा एक धक्कादायक रिपोर्ट समोर आला आहे. यामध्ये सध्या रुग्णालयांमध्ये 84 हजार भारतीयांसाठी एक बेड, तर, 36 हजार भारतीयांसाठी एक क्वारंटाईन बेड आहे. कोरोनाव्हायरसने थैमान घातल्यानंतर सरकारच्या वतीने ही आकडेवारी गोळा करण्यात आली. काही राज्यांमध्ये तर 11 हजार 600 भारतीयांसाठी एकच डॉक्टर असणार आहे.

देशभरात करोनाग्रस्तांची संख्या झपाट्यानं वाढू लागली आहे. त्यातच महानगरांमधून गावी जाणाऱ्या लोकांनी रेल्वेमध्ये मोठी गर्दी केली आहे. शिवाय आता रेल्वे प्रवाशांमध्येही करोनाचे रूग्ण आढळून आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

रेल्वे मंत्रालयानं या संदर्भात काढलेल्या पत्रकानुसार, आतापर्यंत करोना व्हायरस रोखण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून रविवारी मंध्यरात्रीपासून ३१ मार्चपर्यंत देशातील सर्व प्रवासी रेल्वे सेवा बंद करण्यात येत आहे. सर्व प्रकारच्या मेल/एक्स्प्रेस आणि इंटरसिटी ट्रेन्स (प्रिमियम ट्रेन्ससह) आणि सर्व पॅसेंजर ट्रेन्स ह्या ३१ मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.

 

News English Summery:  In the wake of Corona, all passenger traffic, except cargo, will be closed shortly after midnight on Sunday. The railway administration has said that the long-haul train was canceled till March 31. The decision by the railway seems to be moving the country towards lockdown. Earlier, it was decided to cancel several trains due to the increasing transmission of corona virus. However, as the number of coroners in the country is increasing day by day, the railway administration has taken a big step and has decided to shut down the entire railway service. The central government seems to have decided to shut down the transport system so that the corona virus would not spread across the country. However, Corona is currently the world’s largest smoker. The virus is spreading rapidly in India too. Although Corona is in the second stage in India, more than 300 patients in the country have been infected with Corona. A shocking report from the Central Health Department has come out. It currently has one bed for 84,000 Indians in hospitals, and one quarantine bed for 36 000 Indians. The figures were collected on behalf of the government after the coronavirus banned it. In some states, there will be only one doctor for 11,600 Indians.

 

News English Title:  Story No train except goods train will be Run up to 31 March News latest Updates.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x