28 March 2024 5:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल? Reliance Share Price | होय! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पैसे दुप्पट करणार, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राइस जाहीर
x

सत्ताकाळात पैसा पुतळे उभारण्यात; आज ३६,००० भारतीयांसाठी एक क्वारंटाईन बेडची वेळ

Corona Crisis, India Facts

मुंबई, २२ मार्च: कोरोना व्हायरस देशभर पसरू नये, म्हणून केंद्र सरकारने वाहतूक व्यवस्था बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं दिसत आहे. मात्र कोरोनाने सध्या साऱ्या जगात धुमशान घातले आहे. भारतातही मोठ्या वेगाने हा विषाणू पसरत आहे. भारतात कोरोना दुसऱ्या टप्प्यात असला तरी, देशात ३०० पेक्षा अधिक रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. या सगळ्यात केंद्रीय आरोग्य विभागाचा एक धक्कादायक रिपोर्ट समोर आला आहे. यामध्ये सध्या रुग्णालयांमध्ये ८४,००० भारतीयांसाठी एक बेड, तर, ३६,००० भारतीयांसाठी एक क्वारंटाईन बेड आहे. कोरोनाव्हायरसने थैमान घातल्यानंतर सरकारच्या वतीने ही आकडेवारी गोळा करण्यात आली. काही राज्यांमध्ये तर ११,६०० भारतीयांसाठी एकच डॉक्टर असणार आहे.

याच माहितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील नागरिकांना जनता कर्फ्यूचे आवाहन केलं असण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. देशातील आरोग्य व्यवस्थेवर पडणारा ताण कमी व्हावा, करोनाचा प्रसार थांबावा आणि करोनाग्रस्तांच्या वाढत्या आकड्याला लगाम लावण्यासाठी मोदींनी जनतेला घराबाहेर न पडण्याचं आवाहन केल्याचे समजते.

विशेष म्हणजे मागील ६ वर्ष मोदी सरकारने अत्याधुनिक इस्पितळं उभारणं आणि आरोग्य व्यवस्था बळकट करण्यावर भर दिला नाही. अक्षरशः नकोत्या हव्यासापोटी ३ हजार कोटी इतक्या मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करून पुतळे उभारले जे आज ३१ मार्च पर्यंत बंद आहेत. भविष्याचा विचार करता त्याचा दुसरा अर्थ हाच होतो की देशवासीयांच्या मुख्य गरजा मोदी सरकारला कळतंच नाहीत आणि परिणामी कोरोनासारखी आपत्ती ओढावल्यावर, समाज माध्यमांच्या आडून लोकांच्या डोळ्यावरची झडप उघडणार नाही याची खबरदारी मोदी सरकारला घ्यावी लागत आहे आणि त्याने मूळ प्रश्न अधांतरीच राहून जातात.

देशभरात करोनाग्रस्तांची संख्या झपाट्यानं वाढू लागली आहे. त्यातच महानगरांमधून गावी जाणाऱ्या लोकांनी रेल्वेमध्ये मोठी गर्दी केली आहे. शिवाय आता रेल्वे प्रवाशांमध्येही करोनाचे रूग्ण आढळून आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

रेल्वे मंत्रालयानं या संदर्भात काढलेल्या पत्रकानुसार, आतापर्यंत करोना व्हायरस रोखण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून रविवारी मंध्यरात्रीपासून ३१ मार्चपर्यंत देशातील सर्व प्रवासी रेल्वे सेवा बंद करण्यात येत आहे. सर्व प्रकारच्या मेल/एक्स्प्रेस आणि इंटरसिटी ट्रेन्स (प्रिमियम ट्रेन्ससह) आणि सर्व पॅसेंजर ट्रेन्स ह्या ३१ मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.

 

News English Summery: The central government seems to have decided to shut down the transport system so that the corona virus would not spread across the country. However, Corona is currently the world’s largest smoker. The virus is spreading rapidly in India too. Although Corona is in the second stage in India, more than 300 patients have been infected with Corona in the country. A shocking report from the Central Health Department has come out. It currently has one bed for 84,000 Indians in hospitals, while a quarantine bed for 36,000 Indians. The figures were collected on behalf of the government after the corona virus banned it. In some states, there will be only one doctor for 11600 Indians. Experts have suggested that Prime Minister Narendra Modi may have appealed to the people of the country for a curfew. Modi understands that people should not go out of their homes to reduce the strain on the health system in the country, curb the spread of corona and curb the growing number of people suffering from coronary diseases.

 

News English Title:  Story one isolation bed per 84000 peoples 1 quarantine bed per 36000 one doctor per 11600 Indians government data News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x