18 April 2024 7:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 19 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, अल्पावधीत दिला 85 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
x

राज्यात संचारबंदी लागू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

CM Uddhav Thackeray, Corona Crisis

मुंबई, २३ मार्च: रोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आणखी कठोर पाऊल उचलले आहे. राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या सीमा सील करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले. संचारबंदीदरम्यान रस्त्यावर ५ पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊ नये, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

पुढचे काही दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. ती भीती लक्षात घेऊच आपण संचारबंदी लागू करत आहोत असंही उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य तसंच इतर आवश्यक सेवा सुरु राहतील. मात्र ते वगळून पूर्ण संचारबंदी असेल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

तसेच जिल्हाबंदी देखील लागू केली आहे. कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात येत आहेत. मुंबई, पुणे सारख्या शहरात आजही अनेक नागरिक रस्त्यावर फिरताना दिसत असल्याने संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मोठ्या शहरातील लोकांना आवाहन करूनही त्यांनी रस्त्यावर येणं थांबवलं नसल्याने सरकारला हा कठोर निर्णय घ्यावा लागला असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे देशांतर्गत विमानसेवा अजूनही सुरू आहे, यावर देखील आपण केंद्राला पत्र पाठवल आहे, देशांतर्गत विमानसेवा देखील लवकरच बंद होईल, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

 

News English Summery:  Chief Minister Uddhav Thackeray has taken even more drastic steps in the wake of Rona. The Chief Minister has announced the imposition of ban on communication everywhere in the state. The Chief Minister also ordered to seal the boundaries of each district in the state. The Chief Minister has directed that no more than 5 people should be gathered on the road during the shutdown. The next few days are very important. Uddhav Thackeray also announced that we are implementing a communication ban in view of those fears. Essentials, food and other essential services will continue. However, excluding it, there will be a complete ban on communication, said Chief Minister Uddhav Thackeray.

 

News English Title:  Story Chief Minister Uddhav Thackeray imposed curfew in Maharashtra state borders sealed News Latest Updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x