25 April 2024 7:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

महाराष्ट्रात चिंता वाढली, कोरोना रुग्णांची संख्या १०१ वर

Corona Virus Crisis, Maharashtra

मुंबई, २४ मार्च: भारतामध्ये एकीकडे ३७ कोरोनाचे रुग्ण बरे होऊन आज घरी जाणार आहेत तर दुसरीकडे महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा वाढला आहे. कालपर्यंत कोरोनाच्या रुग्णांची संख्या ९७ होती पण आता कोरोनाचे आणखी ४ पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले आहेत. पुण्यात 3 तर साताऱ्यामध्ये कोरोनाचा १ असे चार नवे रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या १०१ झाली आहे.

राज्यात सोमवारी कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ९७ इतकी होती. त्यात मुंबई ३८, पुणे २८, नवी मुंबई ५, सांगली, नागपूर, यवतमाळ, कल्याण प्रत्येकी ४, नगर, ठाणे प्रत्येकी २, पनवेल, उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी, वसई विरार, सातारा प्रत्येकी १ अशी संख्या होती. त्यात आता पुण्यामध्ये आणखी ३ आणि साताऱ्यात एका रुग्णाची भर पडली. अशा रितीने हा आकडा १०१ असा झाला आहे.

दरम्यान, करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलले असून राज्यात आधी जमावबंदी आणि आता संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच लोकांना घराबाहेर पडण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र तरीही मुंबई-पुण्यातील काही लोक बेपर्वाईने वागत असल्याचं दिसून आल्याने सरकारने या लोकांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

 

News English Summery:  In India, 37 coronary patients are recovering and going home today, while on the other hand, the number of coronary patients has increased in Maharashtra. As of yesterday, the number of Corona patients was 97 but now 4 more Corona patients have come forward. Four new patients have been reported in Pune, 3 and 1 in Satara. As a result, the number of coronary patients has increased to 101 in Maharashtra. The number of coronary patients was 97 on Monday in the state. They were numbered 38, Pune 28, Navi Mumbai 5, Sangli, Nagpur, Yavatmal, Kalyan 4, Nagar, Thane 2, Panvel, Ulhasnagar, Aurangabad, Ratnagiri, Vasai Virar, Satara 1 each. It added 3 more patients in Pune and one patient in Satara. Thus, the figure is 101.

 

News English Title: Story Corona virus outbreak Maharashtra total corona cases jump to 104 and 2 death News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x