25 April 2024 3:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार? Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्स खरेदीला गर्दी, अवघ्या 4 वर्षात 1 लाख रुपयांवर दिला 21 लाख रुपये परतावा Amara Raja Share Price | मार्ग श्रीमंतीचा! हा शेअर खरेदी करा, अवघ्या 5 दिवसात दिला 33 टक्के परतावा Reliance Home Finance Share Price | 3 रुपयाचा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, अवघ्या 2 दिवसात 10% परतावा, खरेदीला गर्दी
x

VIDEO - पुण्यातील कंपनीच्या कोविड-१९ स्वस्त चाचणी किटला केंद्रांची मंजुरी

Latest Updates. Corona Crisis, Covid 19, MyLab Firm

पुणे, २४ मार्च: कोरोना विषाणू शोध चाचणीसाठी पुण्यातील मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन्सच्या किटला केंद्र सरकारच्या सेंट्रल ड्रग्ज स्टॅण्डर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने मंजुरी दिली आहे. कंपनीनेच ही माहिती दिली. सध्या केंद्र सरकार बाहेरील देशांमधून हे किट आयात करते. ते महागही आहे पण त्याच्या खर्चापेक्षा एक चतुर्थांश कमी खर्चात कंपनीचे किट उपलब्ध होणार आहे. याचा देशातील नागरिकांना फायदा होणार आहे. या किटच्या साह्याने केलेल्या चाचणीचे निकाल बिनचूक असणार आहेत, असेही कंपनीने स्पष्ट केले.

पुण्यातल्या Mylab Discovery Solutions Pvt Ltd या कंपनीने ही किट तयार केलेली आहेत. Molecular Diagnostics क्षेत्रात या कंपनीचं काम असून, अशा विविध आजारांचं निदान करण्यासाठीच्या अनेक किट्स त्यांनी याआधी बनवल्या आहेत. सध्या कोरोनाची तपासणी करण्यासाठी भारत जर्मनीमधून ही किट्स मागवतो. मात्र जगभरात कोरोनाचा फैलाव झाल्यानं या किट्सला जगात प्रचंड मागणी आहे, त्यामुळे भारताला महागड्या किमतीत ही किट्स खरेदी करावी लागतात. तसेच त्याचा तुटवडा असल्यानं भरमसाट किंमतही मोजावी लागते. पण पुण्याच्या या कंपनीच्या दाव्यामुळे आता भारताची अडचण काही प्रमाणात कमी होणार आहेत.

मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन्सचे व्यवस्थापकीय संचालक हसमुख रावळ म्हणाले, आमचे हे किट जागतिक आरोग्य संघटनेने घालून दिलेल्या आंतरराष्ट्रीय मानकांनुसारच आहे. अत्यंत कमी वेळेत कंपनीने हे किट विकसित केले आहे. मेक इंन इंडिया संकल्पनेला आमचा कायम पाठिंबा राहिला आहे.

दुसरीकडे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने देशातील १६ खासगी लॅबना कोरोना विषाणू शोध चाचणी कऱण्याला मंजुरी दिली आहे. अर्थात त्यासाठी सरकारने कमाल किती रक्कम आकारता येईल हे सुद्धा निश्चित करून दिले आहे. या चाचणीसाठी ४५०० रुपये इतकी दरनिश्चिती करण्यात आली आहे. यामध्ये १५०० रुपये स्क्रिनिंग टेस्टसाठी तर ३००० रुपये कन्फर्मेशन टेस्टसाठी आहेत.

 

News English Summery:  The Mylab Discovery Solutions kit in Pune has been approved by the Central Drugs Standard Control Organization of the Central Government for the Corona virus detection test. The company provided this information. Currently the central government imports this kit from foreign countries. It’s expensive, but the company’s kit will be available for a quarter less than its cost. This is going to benefit the citizens of the country. The results of the test with the help of this kit will be perfect, the company said. This kit has been developed by Mylab Discovery Solutions Pvt Ltd in Pune. The company is working in the field of Molecular Diagnostics, and has already developed several kits for diagnosing various diseases. India currently orders these kits from Germany to test the corona. However, due to the proliferation of Corona globally, these kits are in high demand in the world, so India has to buy these kits at expensive prices. It also costs a great deal to break down. But the Pune company claims that India’s problems will be reduced to some extent now.

 

News English Title:  Story Pune firm MyLab gets approval for first made in India Covid 19 testing kit News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x