19 April 2024 12:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mastek Share Price | 40 रुपयाच्या शेअरची कमाल! तब्बल 4000 टक्के परतावा दिला, आता एका दिवसात 20% वाढला Infosys Share Price | भरवशाचे टॉप 7 शेअर्स स्वस्त झाले, पण व्हॉल्यूम लाखोमध्ये, संयम राखल्यास मिळेल मल्टिबॅगर परतावा IREDA Share Price | IREDA शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, सर्किट फिल्टरही वाढला, स्टॉक तुफान तेजीत येणार? Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत मोठी अपडेट, 1 वर्षात 412% परतावा देणारा 39 रुपयाचा शेअर तेजीत येणार? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत महिना SIP करा, हमखास 12 लाख रुपये परतावा मिळेल BYD Atto 3 | खुशखबर! आता BYD Atto 3 ई-कारला नो वेटिंग, झटपट डिलिव्हरी मिळणार, प्राईससह फीचर्स जाणून घ्या ICICI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा! महिना 10,000 रुपयांच्या SIP ने मिळेल 78.32 लाख रुपये परतावा, स्कीम लक्षात ठेवा
x

फडणवीस आणि केंदीय मंत्री अनंत गीते यांच्यात बंद दरवाजाआड चर्चा

मुंबई : चंद्राबाबू नायडू यांचा टीडीपी पक्ष एनडीए मधून बाहेर पडल्यापासून दिल्लीतील राजकीय वातावरण आधीच तापलेले आहे. त्यात एका कार्यक्रमाच्या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे केंदीय मंत्री अनंत गीते यांच्यात बंद दरवाजाआड चर्चा झाल्याने राजकीय कुजबुज सुरु झाली आहे.

सह्याद्री अतिथीगृहात इलेक्ट्रिक बस उदघाट्न कार्यक्रमा दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे केंदीय मंत्री अनंत गीते उपस्थित होते. उदघाट्न कार्यक्रम संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंदीय मंत्री अनंत गीते यांच्यात अतिथीगृहात बंद दरवाजाआड चर्चा झाली.

परंतु नंतर प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला असता आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे अनंत गीते यांनी सांगितले. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हेच पक्षाची ध्येय धोरण ठरून ती जाहीर करतात अशी अनंत गीते यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

एनडीएमधून टीडीपी आधीच बाहेर पडला असून शिवसेना अजून एनडीएमध्येच आहे परंतु यापुढील निवडणूक ते स्वतंत्र लढणार असल्याचे घोषित केले आहे. शिवसेना सत्तेत आल्यापासूनच भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. परंतु दिल्लीतील हालचाली पाहता भाजपने शिवसेनेला गोंजरायला सुरुवात केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाऊ लागले आहे.

काही दिवसांपूर्वीच भाजप महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे शिवसेना आमच्यासोबतच राहील असे वक्तव्य केले होते. तसेच राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एकतर्फीच वक्तव्य केलं होत की, आगामी निवडणुकीत शिवसेना आणि भाजप युती होणार आहे. परंतु शिवसेनेने त्यांना कोणताही प्रतिसाद दिला नसून सुद्धा भाजप मधला वाढता एकतर्फी आशावाद पाहून सर्वच जण आश्चर्यचकित झाले आहेत.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x