24 April 2024 2:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला Infosys Share Price | इन्फोसिस शेअर सहित हे 5 शेअर्स खिसे भरणार, 44 टक्केपर्यंत परतावा सहज मिळेल GTL Share Price | मालामाल करणार स्वस्त GTL शेअर! देईल 200 टक्के परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले जाणून घ्या
x

२१ वर्षीय नर्सला कोरोनाची लागण; चाचणी पॉझिटिव्ह

Corona Crisis, Covid 19, nurse in Gurgaon tests positive

गुडगाव, २५ मार्च:  कोरोना व्हायरस आता अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांना देखील लक्ष करत असल्याने सरकारची चिंता वाढली आहे. गुरगाव मधील एका खाजगी इस्पितळातील २१ वर्षीय नर्सला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं असून, तिचा टेस्ट रिपोर्ट देखील पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे हरयाणातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता १७ वर पोहोचली आहे. पीटीआय’ने देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

दरम्यान महाराष्ट्रातील कोरोनाचं थैमान दिवसेंदिवस वाढत चाललं असून, रुग्णांची संख्यादेखील ११६वरून १२२वर गेली आहे. आज सकाळी सांगली येथील एकाच कुटुंबातील ५ सदस्य संसर्गातून बाधित आढळून आले आहेत. मुंबईतल्या ४ जणांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच मुंबईत नव्याने ५ आणि ठाणे येथे १ रुग्ण असे सहा रुग्ण आढळून आले आहेत.

कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. २१ दिवस म्हणजेच १४ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन असणार आहे. पुढचे २१ दिवस कुणालाही घराबाहेर पडता येणार नाही. रस्त्यांवरून विना आयडी फिरणाऱ्यांवर आणि विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. देशात अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा वगळता सर्व बंद ठेवण्याचे निर्देश केंद्राकडून देण्यात आले आहेत.

 

News English Summery:  The government’s concerns have increased as the Corona virus is now catching on to essential service providers as well. A 21-year-old nurse from a private hospital in Gurgaon has been diagnosed with coronary infection and her test report has also been positive. As a result, the number of coronally affected patients in Haryana has now reached 17. PTI has also confirmed the incident. Meanwhile, the coronary crisis in Maharashtra is increasing day by day, the number of patients has also increased from 116 to 122. This morning, 5 members of the same family in Sangli were found to be infected. Four people were taken to Kasturba Hospital in Mumbai. Six new patients have been found in Mumbai and five in Thane and 1 in Thane.

 

News English Title:  Story 21 year old nurse working for private hospital in Gurgaon tests positive for COVID 19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x