29 March 2024 5:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर? IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?
x

प्रमुख देश लॉकडाउन तर चीनमध्ये उत्पादक कारखाने सुरू; जगाची शंका बळावते आहे?

China Corona Crisis, Covid 19, News Latest Updates

बीजिंग, २६ मार्च: कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार माजवला आहे. कोरोनामुळे जगभरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता १४ हजार पार गेली आहे. यामध्ये सर्वाधिक मृत्यू हे इटलीमध्ये झाले आहेत. इटलीमध्ये आतापर्यंत ५ हजार ४६१ लोकांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. मागील २४ तासांबाबत बोलायचे झाले तर इटलीमध्ये ६५१ लोकांनी आपला जीव गमावला आहे. इटलीमधील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे. इटलीमध्ये मृतांची संख्या पाच हजारांवर पोहोचली आहे. त्यातही गेल्या रविवारपासूनचे आकडे जास्त भितीदायक आहेत.

युनाटडेड किंगडममध्ये करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. यूकेसमोर आज करोना व्हायरसबरोबर व्हेंटिलेटरचेही आव्हान आहे. यूकेमध्ये व्हेंटिलेटरची मोठया प्रमाणावर कमतरता आहे. याच समस्येवर तोडगा शोधून काढण्यासाठी आता फॉर्म्युला वन रेसिंग टीम्स, कॉर्पोरेटस आणि सिमेन्स एजी, एअरबस एसई या कंपन्यांनी काम सुरु केले आहे. म्हणजे इंग्लंड मधील उत्पादक कंपन्या देखील त्यांचं मुख्य प्रॉडक्ट विसरून कोरोनामुळे उदभवलेल्या आरोग्य आणीबाणीविरुद्ध लढण्यात व्यस्त झाले आहेत.

त्यानंतर अमेरिकेत कोरोना रुग्णांच्या मृतांची संख्या एक हजारावर पोहचली. तिथे सलग दुसऱ्या दिवशी २०० हून अधिक जणांचा बळी गेला. न्यूयॉर्कमध्ये सर्वाधिक ३६६ जण मृत्युमुखी पडले आहेत. इटलीत सलग सहाव्या दिवशी ६०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. गेल्या २४ तासांत इटलीत ६८३ जणांचा बळी गेला. इटलीमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ७५ हजाराजवळ पोहचली आहे.

स्पेनमध्ये मृतांचा आकडा ३६४५ इतका झालाय. स्पेनमध्ये सलग तिसऱ्या दिवशी ५०० हून अधिक रुग्णांचा बळी गेला. गेल्या २४ तासांत स्पेनमध्ये ६५६ बळी गेले, तर कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ५० हजारांच्या घरात पोहचली आहे. इराणमध्ये मृतांचा अकडा दोन हजारपार झाला आहे. इराणमध्ये आतापर्यंत २०७७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. फ्रान्समध्येही मृतांचा आकडा झपाट्यानं वाढत आहे. तिथे १३३१ रुग्णांचा बळी गेलाय.

असं असताना चीनमधील हुबेई शहरासहित संपूर्ण चीन आता हळूहळू पूर्वपदावर येताना दिसत आहे. विशेष म्हणजे या प्रांतातील मोटार आणि त्यासाठी लागणाऱ्या छोट्या भागांच्या उत्पादनाचे कारखाने सुरू झाले आहेत. कामगार कारखानात येऊन काम करू लागले आहेत. कोरोनाचा प्रतिकार करीत असलेल्या संपूर्ण जगासाठी ही दिलासादायक बातमी असली तरी चीनविरुद्ध अनेकांना शंका येऊ लागल्याचं दिसत आहे.

हुबेईची राजधानी वुहानमध्येही परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे. त्यामुळे या भागात आता कामगार कामावर परतू लागले आहेत. कारखान्यातील सर्व काम पुन्हा सुरळीत करण्यासाठीही प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. चीन ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. एकीकडे कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी युरोप, अमेरिका आणि भारतानेही आपल्या येथील सर्व कारखाने तूर्त बंद केले आहेत. पण दुसरीकडे चीन या जागतिक महासाथीतून बाहेर पडला असून, तेथील हुबेई प्रांतात जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे.

 

News English Summery:  Locked down in Hubei Province, China, for the past several days following the outbreak of the Corona virus. But the situation in this area is slowly returning to its former position. In particular, the motor factories of small parts of the province have been started. Workers have come to the factory and started working. This must be comforting news for the whole world that is defending Corona. Hubei Province is a famous part of car manufacturing in China. Many car manufacturing companies are in the same area. But after the Corona virus spread in the area, all of these factories were shelved. Everyone was locked up at home in the lock down. But now the infection in these areas has decreased. In Wuhan, the capital of Hubei, conditions are beginning to recover. As a result, workers are now returning to work in these areas. Efforts have also been made to resume all factory work.

 

News English Title: Story back to business car factories in China return to life one vehicle at a time News Latest Updates.

हॅशटॅग्स

#International(41)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x