19 April 2024 9:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

कोरोनाच्या संसर्गासंदर्भात अमिताभ बच्चन यांनी चुकीची माहिती प्रसिद्ध केली

Amitabh Bachchan, Corona Crisis, Fake Information

मुंबई, २६ मार्च: चीनमध्ये कोरोना व्हायरसचा धोका वाढू लागला तो हुबेई प्रांतातल्या वुहान या शहरातून. वुहानमधून हा विषाणू जगभरात पसरला आणि त्यानं रौद्र रूप धारण केलं. आता कोरोनाव्हायरसचं केंद्र चीनमधून इटलीत हललं आहे. स्पेनमधली दोन शहरही केंद्र होण्याच्या वाटेवर आहेत. आशिया खंडात आता चीननंतर भारताकडे धोका म्हणून पाहिलं जात आहे. त्यातही महाराष्ट्र आणि मुंबई या महासाथीचं भारतातलं केंद्र बनतं की काय अशी भीती आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. ती संख्या ही बातमी प्रसिद्ध होईपर्यंत १२५ होती. गुरुवारी दिवसभरात कोरोनाव्हायरग्रस्तांची संख्या फक्त मुंबईत १५ ने वाढली. मुंबई महानगरात दिवसभरात दोन कोरोनाग्रस्त महिलांचे मृत्यूही झाले. आता मुंबईत उपचार घेत असलेल्या कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बस ७७ वर पोहोचली आहे. या साथीचा पॅटर्न पाहता मुंबईत धोका वाढला आहे.

दरम्यान याच परिस्थितीवर बोलताना अमिताभ यांनी चीनने केलेल्या संशोधनाचा हवाला देत ट्विट मध्ये म्हटले होते की, ‘आपला संपूर्ण देश कोरोनाविरोधात झुंज देत असूूून चीनच्या संशोधनात दिसून आले आहे की, कोरोना विषाणू मानवी विष्ठेमध्ये कित्येक आठवड्यांपर्यंत जिवंत राहू शकतो आणि विष्ठेवर बसलेली माशी जर फळे, भाज्या अथवा अन्य कोणत्याही खाण्यापिण्यासारख्या पदार्थावर बसली तर ते दूषित होऊन कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो, म्हणूनच उघड्यावर शौचास बसू नका आणि शौचालयाचा वापर करा. आपल्या घरात सुरक्षित रहा, असे या ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओतून अमिताभ यांनी आवाहन केले होते.

त्यानंतर आज नवी दिल्लीमध्ये नैमित्तिक पत्रकार परिषदेत लव आगरवाल यांनी कोरोना विषाणूच्या भारतातील संक्रमणाबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, कोरोना विषाणूबाधितांची संख्या वाढते आहे हे निश्चित. पण त्याची गती बघितली तर फैलाव अजून आटोक्यात आहे. अर्थात हे खूप प्राथमिक निरीक्षण आहे. यावेळी त्यांना माश्यांमुळे कोरोना व्हायरस पसरतो का, या अमिताभ बच्चन यांच्या व्हि़डीओवरून प्रश्न विचारला असता त्यांनी सरळ नाही असे उत्तर दिले. तसेच मी त्यांचे ट्विट पाहिलेले नाही. मात्र, एवढे जरूर सांगू शकतो की व्हायरसचे संक्रमण माश्यांमुळे होत नाही.

 

News English Summery: Citing China’s research, Amitabh said in a tweet, “China’s research has shown that our entire country is struggling against corona, and that the corona virus can survive in human feces for weeks, and if the flies are on fruits, vegetables, or any other food. If sitting, it can become corrupted and infect the corona, let’s say Do not sit on the toilet and use the toilet at the open door. Amitabh had appealed from a video shared on Twitter saying “stay safe in your house”. Later in a press conference in New Delhi today, Love Agarwal informed about India’s transmission of the corona virus. That said, it is certain that the number of corona infections is increasing. But if we look at its speed, the spread is still under control. Of course this is a very basic observation. When asked about Amitabh Bachchan’s video, he was not straightforward when asked if he could spread the Corona virus due to fishes at this time. Also I haven’t seen their tweet. However, one can say with certainty that the virus is not transmitted by fish.

 

News English Title:  Story corona virus Bollywood Superstar Amitabh Bachchans claim corona spread flies was false health ministry News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x