25 April 2024 2:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला
x

कडक उन्हाळ्यामुळे करोनाची साथ वेगाने पसरणार नाही - डॉ. के. श्रीनाथ रेड्डी

Corona Crisis, Corona Virus

मुंबई, २७ मार्च : देशभरात करोना विषाणू जलदगतीने पसरत आहे. आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत ७२४ लोकांना करोनाचा संसर्ग झाला असून आतापर्यंत १७ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर यां पैकी ६६ करोनाबाधित बरे होऊन घरी गेले आहेत. गुरुवारी सुमारे ८८ नवे रुग्ण आढळले असून रात्रीपर्यंत करोनाबाधितांची संख्या ६९४ वर जाऊन पोहोचली आहे. जगभरात आतापर्यंत ५ लाख २६ हजार लोकांना करोनाचा संसर्ग झाला आहे, तर आतापर्यंत २४ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.

काल नवी दिल्लीमध्ये नैमित्तिक पत्रकार परिषदेत लव आगरवाल यांनी कोरोना विषाणूच्या भारतातील संक्रमणाबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, कोरोना विषाणूबाधितांची संख्या वाढते आहे हे निश्चित. पण त्याची गती बघितली तर फैलाव अजून आटोक्यात आहे. अर्थात हे खूप प्राथमिक निरीक्षण आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी देशात १७ राज्यांमध्ये विशेष रुग्णालयांची निर्मिती करण्यात येत आहे असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.

सरकारी पातळीवर अनेक उपाययोजना सुरु असल्या तरी आरोग्याच्या दृष्टीने अनेक बाबी समोर येतं आहेत. २१ दिवसांच्या कालावधीमध्ये भारताला आपल्या आरोग्य यंत्रणेमध्ये सुधारणा करण्याचा वेळ उपलब्ध होईल, असे मत पब्लिक हेल्थ फाऊण्डेशन ऑफ इंडियाचे (पीएचएफआय) अध्यक्ष डॉक्टर के. श्रीनाथ रेड्डी यांनी व्यक्त केलं आहे. तसेच भारतामध्ये करोनाचे आणखीन रुग्ण सापडतील. मात्र त्यामुळे घाबरण्याचं कारण नसल्याचेही रेड्डी यांनी म्हटलं आहे. “प्रत्येक देशामध्ये करोनाचे रुग्ण वाढण्याल्याचे पहायला मिळालं आहे. रुग्णांची संख्या वाढल्यानंतर हळूहळू ती कमी झाल्याचे दिसून आलं आहे. तसचं उन्हाळा सुरु होणार असल्याने करोनाची साथ वेगाने पसरणार नाही,” असंही रेड्डी यांनी म्हटलं आहे.

या विषाणूवर उष्णतेचा परिणाम होत असेल तर येणाऱ्या उन्हाळ्याचा आपल्याला फायदाच होईल. काही अहवालांमध्ये या विषाणूवर उष्णतेचा विपरित परिणाम होतो असं म्हटलं आहे. असं असेल तर हे आपल्या दृष्टीने फायद्याचे ठरले. त्यामुळे आरोग्य यंत्रणेचे सबलिकरण आणि वातावरणाची मदत झाल्यास एप्रिलच्या मध्यापर्यंत किंवा एप्रिल संपेपर्यंत हा रोग पसरण्याचा वेग कमी करता येईल. मात्र आपल्याला महिना दोन महिने अत्यंत सतर्क रहायला हवं. तसेच हिवाळ्यामध्ये ही साथ पुन्हा आली तर त्यासाठीही आपण तयार रहायला हवं. मात्र तोपर्यंत तयारीसाठी आपल्या हातात पुरेसा वेळ असेल.

 

News English Summary: Although many measures are being implemented at the government level, there are many health issues. In a span of 21 days, India will have time to improve its health system, said Dr KK, president of the Public Health Foundation of India (PHFI). Srinath Reddy has expressed. Also, more coronary patients will be found in India. But there is no reason to panic, Reddy said. “Coronary disease has been seen in every country. As the number of patients has increased, it has been shown to gradually decrease. “With the start of summer it will not spread fast,” said Reddy. If the virus is exposed to heat, we will only benefit this coming summer. Some reports have reported that the virus has an adverse effect on heat. If so, it is worth it. Therefore, if the health system is strengthened and the environment helps, the spread of the disease will be reduced by mid-April or the end of April. But we have to be very careful two months a month. We should also be prepared for this occurrence in winter. Until then, you will have ample time to prepare.

 

News English Title: Story corona virus rising Corona virus cases no cause for panic will fall by April end Doctor Reddy News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x