17 April 2024 1:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 17 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 17 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या IDFC First Bank Share Price | बँक FD असा परतावा देणार नाही! पण या बँकेचा शेअर अल्पावधीत देईल 50 टक्केपर्यंत परतावा Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! या टॉप 3 शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत 57 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Port Share Price | अदानी पोर्ट शेअरमध्ये मोठी घसरण होणार? गुंतवणूकदारांनी नेमकं काय करावं? अपडेट आली Lloyds Metal Share Price | कुबेर कृपा करणारा 11 रुपयाचा शेअर, गुंतवणूकदार 3 वर्षात करोडपती झाले, खरेदी करणार? TCS Share Price | तज्ज्ञांकडून टीसीएस शेअर्सला 'ओव्हरवेट' रेटिंग, जाहीर केली मजबूत टार्गेट प्राईस
x

राज्य सरकारकडून भारतीय लष्कराला वैद्यकीय मदतीसंदर्भात लेखी पत्रं

Deputy CM Ajit Pawar, Corona Crisis, Corona Virus

मुंबई, २७ मार्च : कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कर देखील मैदानात उतरले आहे. कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी लष्कराने ‘ऑपरेशन नमस्ते’ लॉन्च केल असून सरकारला मदत करणे ही आमची प्राथमिकता असल्याचे लष्कर प्रमुख लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी म्हटले आहे.

नरवणे यांनी सीमा रेषेवर तैनात असलेल्या आणि इतर ठिकाणी पोस्टिंगवर असलेल्या जवानांना सद्य परिस्थितीत कुटुंबियांची चिंता करु नका अशा सूचना दिल्या आहेत. तसेच कोणीही याकाळात सुट्टीवर जाऊ नये, असेही सैनिकांना सांगण्यात आले आहे. लष्कर प्रमुख म्हणाले की, ‘कोरोना विषाणू विरोधातील लढाई आमची जबाबदारी आहे. आम्ही सरकार आणि जनतेच्या मदतीसाठी सदैव तत्पर आहोत. लष्कर प्रमुख या नात्याने माझ्या जवानांना सुरक्षित आणि फिट ठेवणे ही प्राथमिकता आहे. कर्तव्य बजावण्यासाठी ही गोष्ट महत्त्वाची आहे.

विशेष म्हणजे राज्यसरकारने देखील लष्करासोबत संपर्क केल्याचं वृत्त आहे. याबाबत खुलासा करताना अजित पवार म्हणाले की, राज्य सरकाने लष्कराच्या मदतीसाठी लिहिलेले पत्र हे केवळ लष्कराची वैद्यकीय मदत मिळण्यापुरते मर्यादित असल्याचं त्यांनी सांगितले. तसेच राज्यातील शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी थांबलेली नाही. शेतकरी बायमेट्रीकसाठी तयार नाहीत आणि शासकीय यंत्रणा कोरोना प्रतिबंधासाठी व्यस्त असल्याने यात काहीसा संथपणा आल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

तत्पूर्वी राज्यात केवळ ८ दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा असल्याची चिंता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. संचारबंदीच्या काळात शिस्त पाळून रक्तदान करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. महासंकटात असंवेदनशीलता दाखवू नका, मेडिकल प्रॅक्टिस सुरुच ठेवा असे त्यांनी डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना सांगितले आहे. अनेकजण काही ना काही कारणामुळे दवाखाने बंद ठेवत आहेत. त्यांनी असे करु नये असे आरोग्यमंत्री म्हणाले. कोरोना व्यतिरिक्त अनेक आजारांच्या रुग्णांना यावेळी गरज असते. त्यामुळे हॉस्पिटल्स, लॅब्स सुरु ठेवाव्यात असे आरोग्यमंत्री म्हणाले.

 

News English Summary: Indian Army has also landed to fight the Corona virus. Army Chief Lieutenant General Manoj Mukund Narwane has said that the Army has launched ‘Operation Namaste’ to fight against Corona and assisting the government is our priority. Notably, the state government has also reported contact with the military. Disclosing this, Ajit Pawar said that the letter written by the state government for military assistance was limited to seeking medical help from the army. Similarly, the implementation of loan waiver has not stopped. The farmers are not ready for biometrics and the government is busy with the ban on corona, the Deputy Chief Minister said.

 

News English Title: Story corona virus Deputy CM Ajit Pawar writes letter army state government Medical help cautioned against corona News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x