19 April 2024 7:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

राष्ट्रवादी, काँग्रेसचे लोक मला साथ देत आहेत; राजही मला फोन करून सूचना देतो

Corona Crisis, CM Uddhav Thackeray, Raj Thackeray

मुंबई, २९ मार्च: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले की, परराज्यातील कामगारांनी स्थलांतर करु नये. वर्दळ थांबवावी. नागरिकांनीही घराबाहेर पडू नये. पोलिस त्यांना सहकार्य करतील. त्यांना गांभीर्याने वागले नाही तर सरकारला कठोर पावले उचलावी लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात राष्ट्रवादी, काँग्रेसचे लोक तर माझ्यासोबत आहेतच शिवाय विरोधी पक्षही मला साथ देतो आहे. राजही मला फोन करतो आहे. सूचना देतो आहे. सर्वांनी एकजूट होऊन काम केलं पाहिजे आणि करोनाशी लढा दिला पाहिजे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. एक चांगली टीम तयार झाली आहे.

महाराष्ट्रातल्या डॉक्टरांना मी मानाचा मुजरा करतो असं म्हणत उद्धव ठाकरेंनी हात जोडले. तसंच ज्या डॉक्टरांशी शक्य आहे त्या सगळ्यांशी मी बोलतो आहे मला अनेकांनी सांगितलं तुम्ही डॉक्टरांशी बोला म्हणजे त्यांचं मनोधैर्य वाढेल. त्यांचं मनोधैर्य वाढतं आहे की नाही हे मला ठाऊक नाही मात्र त्यांच्याशी बोलल्यानंतर माझं मनोधैर्य वाढतं. या उर्जेला काय म्हणायचं? आरोग्य विषयक समस्येशी लढणाऱ्या या सगळ्या वीरांना माझा मानाचा मुजरा आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

 

News English Summary: Chief Minister Thackeray interacted with the people of the state in the wake of the corona virus. He added that foreign workers should not migrate. Stop splashing. Citizens should not even go out. The police will cooperate with them. He warned that the government would have to take drastic measures if they were not taken seriously. Nationalists, Congressmen are with me in the fight against Corona, and the opposition is also supporting me. Raj Thackeray also calling me for giving some suggestions. Chief Minister Uddhav Thackeray has said that all should work together and fight against Corona. A good team is formed.

 

News English Title: Story NCP Congress and Raj Thackeray all are supporting me during corona crisis situation says CM Uddhav Thackeray News Latest Updates .

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x