19 April 2024 1:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर 13 रुपयांवर आला, आता IIFL ब्रोकरेज फर्मने टार्गेट प्राइस केली जाहीर Reliance Power share Price | अल्पावधीत 2400% परतावा देणारा रिलायन्स पॉवर शेअर होल्ड करावा की बाहेर पडावे? Samvardhana Motherson Share Price | 18 पैशाच्या शेअरची जादू! गुंतवणुकदार झाले करोडपती, पुढेही फायद्याचा स्टॉक Mastek Share Price | 40 रुपयाच्या शेअरची कमाल! तब्बल 4000 टक्के परतावा दिला, आता एका दिवसात 20% वाढला Infosys Share Price | भरवशाचे टॉप 7 शेअर्स स्वस्त झाले, पण व्हॉल्यूम लाखोमध्ये, संयम राखल्यास मिळेल मल्टिबॅगर परतावा IREDA Share Price | IREDA शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, सर्किट फिल्टरही वाढला, स्टॉक तुफान तेजीत येणार? Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत मोठी अपडेट, 1 वर्षात 412% परतावा देणारा 39 रुपयाचा शेअर तेजीत येणार?
x

लॉकडाउन'बाबत केंद्र आणि राज्यांमध्ये महत्वाची चर्चा होणार

Covid19, Corona Crisis, Lock Down

नवी दिल्ली, ०८ एप्रिल:  लॉकडाऊनचा कालावधी संपत आल्यानं केंद्र आणि राज्य सरकारांनी १५ एप्रिलपासून काय करायचं, याची तयारी सुरू केली आहे. लॉकडाऊन कशा पद्धतीनं हटवायचा, याचा निर्णय येत्या शनिवारी होऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ एप्रिल रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत.

महत्वाचं म्हणजे हातावर पोट असलेल्या कोट्यवधी मजूर आणि कामगारांवर लॉकडाऊनचा अतिशय गंभीर परिणाम झाला आहे. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण आढळून न आलेल्या भागात लागू असलेले निर्बंध शिथिल करण्यात यावेत, असं केंद्राला वाटत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मात्र बहुतांश राज्यांचा लॉकडाऊन हटवण्यास विरोध आहे. कोरोनाबाधितांच्या आकड्यात सातत्यानं वाढ होत असल्यानं राज्य सरकारं चिंतेत आहेत.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी संसदेतील प्रमुख पक्षांच्या गटनेत्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी केले जाणारे प्रयत्न, संक्रमण रोखण्यासाठी लागू करण्यात आलेला लॉकडाऊन आणि या संकटाचा होणारा परिणाम यावर प्रामुख्याने या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.

संसदेमध्ये पाच पेक्षा जास्त प्रतिनिधी असलेल्या पक्षांचे गटनेते या बैठकीत सहभागी झाले होते. २१ दिवसांचा लॉकडाऊन येत्या १४ एप्रिलला संपतो आहे. देशातील सध्याची परिस्थिती बघता लॉकडाऊनच्या कालावधीत वाढ केली जावी का, याही मुद्द्यावर चर्चा झाली. त्याचबरोबर कोरोना महासाथीमुळे अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम लक्षात घेता सरकारने काय उपाययोजना केल्या आहेत, यावरही बैठकीमध्ये चर्चा झाली.

 

News English Summary: As the lock down period ends, central and state governments have begun preparations for what to do on April 15. The decision on how to delete the lock down can be made next Saturday. Prime Minister Narendra Modi will interact with all the chief ministers on April 11 through video conferencing. Importantly, the lock down has had a serious impact on the billions of workers and workers who have tummy tuckers on hand. Therefore, the Center is concerned that the restrictions imposed in areas where coronary patients are not found should be relaxed, sources said. But most states are opposed to the lock down. State governments are concerned that the number of coronaries is steadily increasing.

 

News English Title: Story will corona virus lock down be extended government decide after Prime Minister Narendra Modi meeting Covid19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x